loader
Breaking News
Breaking News
Foto

वैभववाडी तालुक्यातील एस.टी. बससेवेशी संबंधित विविध समस्या व प्रवाशांच्या अडचणींबाबत पंचायत समिती वैभववाडीच्या सभागृहात सकारात्मक चर्चा

वैभववाडी(प्रतिनिधी)- तालुक्यातील एस.टी. बससेवेशी संबंधित विविध समस्या व प्रवाशांच्या अडचणींबाबत पंचायत समिती वैभववाडीच्या सभागृहात सकारात्मक चर्चा करण्यात आली. सभापती सिद्धेश रावराणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस परिवहन मंडळाचे विभागीय अधिकारी तसेच पालकमंत्री नितेश राणे यांचे विशेष कार्य अधिकारी (जडऊ) भोगटे उपस्थित होते. तालुक्यातील एस.टी. बससेवेतील विविध समस्या, बसफेर्‍या तसेच प्रवाशांना भेडसावणार्‍या अडचणी याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. या समस्या जाणून घेऊन त्यावर मार्ग काढण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी आपले विशेष कार्य अधिकारी (जडऊ) भोगटे यांना बैठकीसाठी पाठविले. यावेळी कुर्ली वैभववाडी कायमस्वरूपी एस.टी. बसफेरी सुरू करण्याची मागणी करण्यात आली. तसेच फोंडा मार्गे लोरे-आचिर्णे-खांबाळे-वैभववाडी-कोल्हापूर अशी नवीन एस.टी. बसफेरी सुरू करण्याची मागणीही करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तालुक्यातील मानव विकास कार्यक्रमांतर्गत असलेल्या सर्व एस.टी. बस कणकवली येथे न ठेवता वैभववाडी येथे कायमस्वरूपी ठेवाव्यात, अशी मागणी करण्यात आली. तसेच ५ ते ७ एस.टी. बसफेर्‍या खारेपाटणभुईबावडा मार्गे कोल्हापूर किंवा उंबर्डे-भुईबावडा मार्गे कोल्हापूर अशा स्वरूपात सुरू ठेवाव्यात, अशी मागणीही बैठकीत करण्यात आली. वैभववाडी एस.टी. बसस्थानकात दोन वाहतूक नियंत्रकांची नियुक्ती करावी, जेणेकरून बसफेर्‍यांचे योग्य नियोजन तसेच प्रवाशांना आवश्यक माहिती मिळू शकेल, अशी मागणी करण्यात आली. तसेच बसस्थानकात प्रवाशांच्या सोयीसाठी स्वच्छतागृह उभारावे, अशी मागणीही करण्यात आली. तसेच वैभववाडी तालुक्यातील प्रवाशांना रेल्वेची सुविधा सहज उपलब्ध व्हावी यासाठी रेल्वेच्या वेळेनुसार वैभववाडीहून रेल्वे स्थानकापर्यंत कायमस्वरूपी एस.टी. बसफेरी सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली. तालुक्यातील विविध मार्गांवरील बससेवा सुरळीत करणे, प्रवाशांच्या अडचणी दूर करणे तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना व नागरिकांना नियमित वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत संबंधित अधिकार्‍यांशी चर्चा करण्यात आली.

टाइम्स स्पेशल

यावेळी जिल्हा परिषद सदस्या रिद्धी रितेश सुतार, श्रावणी रावराणे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नासीर काझी, जिल्हा परिषदेचे माजी वित्त व बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे, पंचायत समितीचे उपसभापती साची कोलते, पंचायत समिती सदस्य मंगेश लोके, देवानंद पालांडे, सुवर्णा संसारे, सहाय्यक गट विकास अधिकारी माने मॅडम आदी उपस्थित होते. तसेच तालुक्यातील सरपंच व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत मांडलेल्या विविध प्रश्नांवर सकारात्मक चर्चा झाल्याने वैभववाडी तालुक्यातील एस.टी. बससेवेच्या समस्यांवर लवकरच मार्ग निघण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg