दापोली (वार्ताहर) : साथी चंदूभाई मेहता यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त साथी चंदूभाई मेहता समाजसेवा प्रतिष्ठान, मुंबई यांच्या वतीने दापोली तालुक्यातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या निबंध स्पर्धेचा निकाल व पारितोषिक वितरण सोहळा नुकताच शिंदे गुरुजी सभागृह, नवभारत छात्रालय, दापोली येथे उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांच्या लेखनकौशल्याला, विचारक्षमतेला व सर्जनशीलतेला व्यासपीठ मिळावे, तसेच विविध सामाजिक व समकालीन विषयांवर विद्यार्थ्यांनी चिंतन करावे, या उद्देशाने या निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. गट क्रमांक एकमध्ये दापोली तालुक्यातील ३० शाळांमधून तब्बल ५२६ निबंध, तर गट क्रमांक दोनमध्ये ११ महाविद्यालयांमधून २६२ निबंध प्राप्त झाले. अशा प्रकारे या स्पर्धेला एकूण ७८८ निबंधांचा उदंड प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ रंगकर्मी अतुल पेठे उपस्थित होते. यावेळी साथी चंदूभाई मेहता समाजसेवा प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त सुधीर देसाई, कार्यक्रम संयोजक डॉ. कुणाल मेहता, परीक्षकांच्या वतीने अमोल नलावडे व डॉ. सई प्रभू, तसेच दापोलीतील विविध क्षेत्रांतील मान्यवर, प्रतिष्ठानचे सदस्य, विविध शाळांचे संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात साथी चंदूभाई मेहता व साने गुरुजी यांच्या प्रतिमेस पुष्पार्पण करून करण्यात आली. साथी चंदूभाई मेहता यांच्या कार्याची व जीवनप्रवासाची माहिती प्रा. कैलास गांधी यांनी उपस्थितांना करून दिली. गट क्रमांक एकमध्ये संजीव शिक्षण संस्थेच्या इंग्लिश मीडियम स्कूल दाभोळ येथील उत्कर्ष तोडणकर याने प्रथम क्रमांक पटकावला. आर. जी. पवार माध्यमिक शाळा, माटवण येथील श्रेयस मुरचवडे याने द्वितीय क्रमांक मिळविला. ए. जी. हायस्कूल, दापोली येथील पूर्वा मांढरे आणि न्यू इंग्लिश स्कूल, तळसुरे येथील वेदांती शिंदे यांना तृतीय क्रमांक विभागून देण्यात आला.
गट क्रमांक दोनमध्ये ए. जी. हायस्कूल, दापोली येथील वैष्णवी लखमदे हिने प्रथम क्रमांक मिळविला. वराडकर महाविद्यालयातील परीक्षेत दाभोळकर यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. तर वराडकर महाविद्यालयातील साक्षी जाधव आणि नॅशनल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमधील शिमाज सौतिरकर यांना तृतीय क्रमांक विभागून देण्यात आला. स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या विजेत्यास रोख रुपये २,५००, द्वितीय क्रमांकास रुपये १,५०० आणि तृतीय क्रमांकास रुपये १,००० तसेच तिन्ही क्रमांकाच्या विजेत्यांना आकर्षक चषक, पुस्तक व प्रशस्तिपत्रक देऊन गौरविण्यात आले. याशिवाय विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाची दखल घेत सात उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली. विशेष म्हणजे, सुरुवातीला केवळ दोन उत्तेजनार्थ पारितोषिके देण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, स्पर्धेला मिळालेला उदंड प्रतिसाद आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लक्षात घेऊन उत्तेजनार्थ पारितोषिकांची संख्या दोनवरून सात करण्यात आली.
































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.