पनवेल : ‘शिक्षण हेच खरे सामर्थ्य’ या विचाराला केंद्रस्थानी ठेवून आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीला बळ देण्यासाठी अशोक छाजेड चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित करण्यात आलेला भव्य शैक्षणिक साहित्य वाटपाचा सामाजिक उपक्रम स्वातंत्र्यदिनाच्या औचित्याने आज मोठ्या उत्साहात आणि आनंदमय वातावरणात संपन्न झाला. कर्जत फाटा येथील एन. डी. स्टुडिओ येथे आयोजित या कार्यक्रमात हजारो विद्यार्थ्यांना मोफत स्कूल बॅग, छत्री आणि वह्यांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमास उरण-खालापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमाला माजी आमदार देवेंद्र साटम, भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, आयोजक अशोक छाजेड, सौ.संगीता अशोक छाजेड, उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल मेहुल, प्रांत अधिकारी प्रकाश सकपाळ, तहसीलदार अभय चव्हाण, एन डी स्टूडियो चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत साजणीकर, मुख्य लेखाधिकारी चित्रलेखा खातू, खालापूर पंचायत समितीचे सभापती कृष्णा पारंगे, जिल्हा परिषद सदस्या नेहा पारंगे, माजी जिल्हा परिषद सदस्य मोतीराम ठोंबरे, सरपंच रीतू ठोंबरे, सुधीर ठोंबरे, भाजपचे मंडल अध्यक्ष प्रवीण मोरे, अशोक छाजेड चॅरिटेबल ट्रस्ट चे उपाध्यक्ष संतोष खांडेकर यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी विद्यार्थी, पालक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आर्थिक परिस्थितीमुळे कोणत्याही विद्यार्थ्याच्या शिक्षणात अडथळा निर्माण होऊ नये, शैक्षणिक साहित्याअभावी विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागू नये आणि प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षणाच्या प्रवाहात आत्मविश्वासाने पुढे जाता यावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांना शाळेसाठी आवश्यक असलेले साहित्य एकाच वेळी उपलब्ध करून देत त्यांच्या शैक्षणिक वाटचालीला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला.शैक्षणिक साहित्य मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद आणि उत्साह या उपक्रमाचे यश अधोरेखित करणारा ठरला. सामाजिक बांधिलकी जपत गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मदतीचा हात देणारा हा उपक्रम समाजासाठी निश्चितच प्रेरणादायी असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
























1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.