loader
Breaking News
Breaking News
Foto

रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयात समरगीत स्पर्धा संपन्न

मालवण (प्रतिनिधी) - मालवण येथील स.का.पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय सलग्न रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयात स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून भव्य 'समरगीत' (देशभक्तीपर गीत) स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत इयत्ता अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनी एकापेक्षा एक सरस देशभक्तीपर गीते सादर करून वातावरण देशप्रेमाच्या रंगात रंगवून टाकले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना रुजावी आणि त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ​कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाचे प्राचार्य यांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली.

टाईम्स स्पेशल

विद्यार्थ्यांच्या सुरेल आणि ऊर्जस्वी सादरीकरणाला उपस्थित शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या गजर करत भरभरून दाद दिली. ​प्राचार्यांनी आपल्या भाषणात सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आणि स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन जान्हवी कदम हिने केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg