अलिबाग (प्रतिनिधी) - अलिबाग येथील रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकारी तथा भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी नेहा भोसले यांची मराठा क्रांती स्वराज्य संघटनेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले यांनी अलिबाग येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी विविध सामाजिक विषयांवर चर्चा करण्यात आली. खेड तालुक्यातील खोपी गावच्या सुकन्या असलेल्या नेहा भोसले यांनी प्रशासकीय सेवेत उच्च पदापर्यंत मजल मारल्याबद्दल सदानंदराव भोसले यांनी त्यांचे कौतुक केले. ग्रामीण भागातून येऊन भारतीय प्रशासकीय सेवेत अधिकारी म्हणून कार्यरत राहणे ही अभिमानाची बाब असून, त्यांच्या यशातून समाजातील विद्यार्थी आणि तरुणांनी प्रेरणा घ्यावी, असे त्यांनी सांगितले.
नेहा भोसले यांची कार्यपद्धती, प्रशासकीय जबाबदारी आणि समाजातील विविध घटकांसाठी काम करण्याची भूमिका याबाबतही यावेळी चर्चा झाली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी शिक्षणाला प्राधान्य देत स्पर्धा परीक्षांची तयारी करावी आणि प्रशासकीय सेवेत जाण्याचे ध्येय ठेवावे, असे आवाहन सदानंदराव भोसले यांनी केले. मराठा समाजातील तसेच सात गाव भोसले कुळातील उच्च प्रशासकीय पदावर कार्यरत असलेल्या नेहा भोसले यांचा समाजाला अभिमान असल्याचेही सदानंदराव भोसले यांनी नमूद केले. पालकांनी आपल्या पाल्यांच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष देऊन त्यांना मोठी स्वप्ने पाहण्यास प्रोत्साहन द्यावे, असे त्यांनी सांगितले. या भेटीदरम्यान रायगड जिल्हा परिषद मुख्याधिकारी नेहा भोसले यांनी सदानंदराव भोसले यांना ‘जय शिवराय’ हे पुस्तक भेट म्हणून दिले. या पुस्तक भेटीबद्दल सदानंदराव भोसले यांनी नेहा भोसले यांचे आभार मानले.
यावेळी सामाजिक कार्य, शिक्षण, युवकांचे प्रश्न आणि समाजातील विद्यार्थ्यांना प्रशासकीय सेवेकडे वळविण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन याबाबतही विचारविनिमय झाला. नेहा भोसले यांचे यश ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी असून, त्यांच्या कार्याचा आदर्श घेऊन अनेक तरुणांनी पुढे यावे, अशी अपेक्षा सदानंदराव भोसले यांनी व्यक्त केली. या सदिच्छा भेटीमुळे सामाजिक क्षेत्र आणि प्रशासन यांच्यातील संवादाला सकारात्मक दिशा मिळाल्याचे उपस्थितांनी सांगितले. या वेळी मराठा क्रांती स्वराज्य संघटना राष्ट्रीय मिडिया अध्यक्ष अभिजित दरेकर तसेच रायगड समाचार वृत्त वाहिनीचे संपादक शिवाजी जाधव हे देखील उपस्थित होते.




















































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)

























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.