loader
Breaking News
Breaking News
Foto

दापोलीतील श्री गोपाळकृष्ण ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेत कथित गैरव्यवहार; १३ जणांविरोधात गुन्हा

दापोली (वार्ताहर) : दापोली येथील श्री गोपाळ कृष्ण ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादितमध्ये सन २०१८-१९ ते २०२२-२३ या कालावधीत २ कोटी ६९ लाख ५० हजार रुपयांचा कथित आर्थिक गैरव्यवहार झाल्याप्रकरणी संस्थेच्या संचालक मंडळातील पदाधिकारी, संचालक, व्यवस्थापक व कर्ज अधिकार्‍यांसह १३ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबद्दल दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांचेकडे या पतसंस्थेच्या संचालक मंडळाविरोधात तक्रार दाखल झाल्यावर त्यांनी दापोली येथील सहकारी संस्थांच्या लेखापरीक्षक श्रीया जीवन झगडे यांची या पतसंस्थेचे लेखापरीक्षण करण्यासाठी लेखापरीक्षक म्हणून १४ ऑगस्ट २०२४ च्या पत्राने नियुक्ती केली होती.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या आदेशानुसार त्यांनी या पतसंस्थेचे सन २०१८-१९ ते २०२२-२३ या कालावधीचे लेखापरीक्षण केले. या लेखापरीक्षणात संस्थेच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, इतर संचालक, व्यवस्थापक व कर्ज अधिकार्‍यांनी संगनमताने कर्जासाठी स्वीकारलेली कागदपत्रे बनावट असल्याची माहिती असतानाही त्याआधारे कर्ज मंजूर करून संस्थेच्या उपविधीतील नियमांचा भंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच कर्जदारांना कर्ज वाटप केल्यानंतर संस्थेतील ठेवीदारांनी विश्वासाने सोपविलेल्या ठेवींचा गैरवापर करून ठेवीदारांची फसवणूक केल्याचेही तक्रारीत नमूद आहे. ही तक्रार लेखापरीक्षक यांनी दापोली पोलीस ठाण्यात नोव्हेंबर २०२५ मध्ये दाखल केली होती, या तक्रारीवर दापोली पोलिसांनी चौकशी करून दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टाईम्स स्पेशल

प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक महेश तोरस्कर करत आहेत. यापुढील तपास हा आर्थिक गुन्हे शाखा रत्नागिरी यांचेकडे सोपविण्यात येणार आहे. या प्रकरणात प्रसाद सूर्यकांत मेहता, सुधीर सदानंद तलाठी, राकेश प्रकाश कोटिया, संजय उमेशचंद्र बुटाला, संजय वसंत साबळे, अतुल काळूराम मेहता, शैला प्रभाकर मेहता, सुप्रिया बाळकृष्ण तलाठी, माधवी माधव शेट्ये, रमेश भागोजी गिम्हवणेकर, सुनील पांडुरंग धोपट, भिकू रामचंद्र मोरे आणि हेमंत आत्माराम कळेकर (मयत) यांच्याविरोधात भारतीय दंड संहितेतील कलम ४०६, ४०९, ४१७, ४१८, ४६५, ४६८, ४७१, १२०(ब), ३४ तसेच महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० मधील कलम १४६ व १४७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे दापोली तालुक्यातील सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे. कोरोनाच्या कालावधीत काही व्यक्तींनी आपण आरोग्य विभागात कर्मचारी आहोत, असे भासवून खोटे कागदपत्र तयार करून त्या आधारे या पतसंस्थेकडून कर्ज घेतले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg