loader
Breaking News
Breaking News
Foto

हर घर तिरंगा अभियानात कोसुंब ग्रामपंचायतीत विविध उपक्रम

संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - निर्मल ग्रामपंचायत कोसुंब येथे ‘हर घर तिरंगा अभियान २०२६’ उत्साहात राबविण्यात आले. या अभियानांतर्गत ग्रामपंचायत हद्दीतील सर्व महिला बचत गटांच्या महिलांनी गावातून तिरंगा प्रभात फेरी काढत देशभक्तीचा संदेश दिला. तसेच महिला बचत गटांच्या वतीने तिरंगा आणि ‘हर घर तिरंगा’ अभियानाची संकल्पना साकारत आकर्षक रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. रांगोळी स्पर्धेत सहभागी झालेल्या महिला बचत गटांना ग्रामपंचायत कोसुंबच्या वतीने सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच अभियानादरम्यान माजी सैनिक बने यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

ग्रामपंचायत कोसुंब अंतर्गत येणाऱ्या सर्व प्राथमिक शाळा आणि अंगणवाड्यांमध्येही ९ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या कालावधीत विविध उपक्रम घेण्यात आले. यामध्ये चित्रकला स्पर्धा, तिरंगा रॅली, निबंध लेखन स्पर्धा आदी कार्यक्रमांचा समावेश होता. कोसुंब ग्रामपंचायतीत आयोजित रांगोळी स्पर्धेचे उद्घाटन ग्रामपंचायत सदस्या दिव्या जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.

टाईम्स स्पेशल

यावेळी ग्रामपंचायत प्रशासक दिनेश जाधव, ग्रामसेवक घडशी, तलाठी पडघम, मुख्याध्यापिका पवार, नते, शिंदे, आरोग्य अधिकारी, सीआरपी लिंगायत, जाधव, सर्व अंगणवाडी सेविका खांबे, बने, लिंगायत, शिंदे, आरोग्य कर्मचारी तसेच सर्व महिला बचत गटांच्या महिला सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. ‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या माध्यमातून कोसुंब ग्रामपंचायतीत देशभक्तीची भावना वृद्धिंगत करण्यासोबतच महिला बचत गट, शाळा आणि अंगणवाडी यांच्या सहभागातून सामाजिक एकजुटीचा संदेश देण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg