दापोली (सागर गोवळे) - कृषी महाविद्यालय दापोलीच्या ग्रामीण जागृती कार्यानुभव कार्यक्रमा (RAWE) अंतर्गत भाटघर येथील हनुमान मंदिरात 'रानमाया' रानभाजी प्रदर्शन व पाककला स्पर्धेचे दिमाखात आयोजन करण्यात आले. सोवेली, भाटघर आणि मुगीज केंद्रातील विद्यार्थ्यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या या उपक्रमात तब्बल ५३ महिलांनी सहभाग नोंदवून रानभाज्यांच्या विविध नाविन्यपूर्ण पदार्थांची चव उपस्थितांना चाखवली. दुर्मीळ व विस्मृतीत चाललेल्या रानभाज्यांचे पोषणमूल्य आणि औषधी महत्त्व शेतकऱ्यांपर्यंत व नागरिकांपर्यंत पोहोचवणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. प्रदर्शनात एकूण ४० प्रकारच्या रानभाज्यांची माहिती देणारे तक्ते मांडण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे उद्घाटन RAWE चे प्रादेशिक प्रमुख डॉ. विजयकुमार देसाई यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी पंचायत समिती सदस्य राजेंद्र फणसे, कृषी अधिकारी व्ही.डी. म्हस्के, सोवेलीचे सरपंच जयेश मानकर, डॉ. एस.एन. काळे, डॉ. झगडे आणि डॉ. शिगवण सर आदी मान्यवर उपस्थित होते. पाककला स्पर्धेचे निकाल: मुगीज-भाटघर गट: प्रथम: विजया कदम (भाटघर) – भारंगीची खीर द्वितीय: अंकिता मडगूळ (मुगीज) – तारंगी कटलेट तृतीय: अर्चना तांबे (भाटघर) – टाकळ्याची पुरी उत्तेजनार्थ: प्राजक्ता खळे – कावळीची वडी
सोवेली गट: प्रथम: मिनाक्षी शिंदे – मिक्स रानभाज्यांचा पराठा (भारंग, कुर्डू, माठ) द्वितीय: अरुणाई चव्हाण – सुरणाची वडी तृतीय: माधुरी चव्हाण – शतावरी भाजी उत्तेजनार्थ: संजीवनी सोविलकर – पेवाची भाजी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भूमी चिबडे हिने केले, तर सलोनी राणे हिने उपस्थितांचे आभार मानले. महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि रानभाज्यांपासून बनवलेल्या नवनवीन पाककृतींमुळे 'रानमाया' प्रदर्शनाने दुर्मीळ भाज्यांना पुनरुज्जीवित करण्याचे मोलाचे काम केले.




























.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.