मंडणगड(प्रतिनिधी)- शिवसेनेत शिवसैनिक या पदाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. मंडणगड तालुका हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता आणि यापुढे देखील बालेकिल्लाच राहणार आहे. त्यासाठी आता मुंबईस्थित मंडणगडवासीय पुढे सरसावले आहेत. यासाठी दादर मुंबई येथील शिवसेना भवनात दापोली विधानसभा संपर्क प्रमुख रवींद्र परब यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांची एक महत्त्वाची सभा पार पडली. या सभेला शिवसेना मंडणगड तालुका मुंबई संघटक विनायक चोरगे, उपसंघटक तसेच नाशिक जिल्हा कळवण - सुरगाणा विधानसभा संपर्क प्रमुख रवींद्र धनावडे, सचिव दीपक बैकर, सहसचिव आणि जळगाव जिल्हा एरंडोल - पारोळा विधानसभा संपर्क प्रमुख सुनील सोंडकर, सल्लागार प्रकाश चाचले, चंद्रकांत होडबे, बाणकोट विभाग संघटक सुनील भानसे, उमरोली विभाग उपसंघटक दिनेश शिगवण आदी प्रमुख पदाधिका-यांसह शिवसैनिक मोठ्या उपस्थित होते.
मंडणगड तालुक्यातील शिवसेना पक्ष संघटनेच्या कामाला सन १९८६ पासून खरी सुरुवात झाली. सन १९९० च्या विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर खर्या अर्थाने या तालुक्यातील पक्ष संघटन अधिक मजबूत झाले. त्यामुळे विधानसभा निवडणूक असो नाहीतर लोक सभा निवडणूक असो प्रत्येक निवडणुकीत या तालुक्याने शिवसेना उमेदवाराला अधिकचे मताधिक्य देऊन शिवसेना उमेदवारांच्या विजयावर शिक्कामोर्तब केले आहे. हा इतिहास आहे. तो कोणीही नाकारू शकणार नाही आणि कोणालाही नाकारता येणार नाही. अशा या येथील मजबूत स्थितीतील शिवसेना पक्ष संघटनेला काही प्रमाणात का होईना थोडीफार शिथिलता आली. त्याची कारणं ही अनेक आहेत. त्यात प्रामुख्याने काही पदाधिकारी आपल्या स्वार्थासाठी पक्ष सोडून गेले. काहींनी शांतच बसणं पसंत केले वगैरे वगैरे पण त्या ही परिस्थितीत अलिकडेच म्हणजे दोन अडीच वर्षांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत मंडणगड तालुक्याने शिवसेना उमेदवाराला भरभरून मतांच दान देत तालूक्यात आपणच दादा असल्याचे दाखवून दिले.
त्यामुळे येथील शिवसेना संघटन तसं मजबूतच पण त्याला थोडी दृष्ट लागली. जे लोकप्रतिनिधी म्हणून लोकसभा आणि विधानसभेत निवडून गेले त्यांनी विकास कामांनी नव्हे तर धनलक्ष्मीच्या जोरावर काहींना फोडून शिवसेना पक्ष संघटन कमकुवत करण्याचा प्रयत्न केला. त्याला काही प्रमाणात त्यांना यशही आले. पण धन लक्ष्मीने जिंकून आलेल्यांचे विकास कामांकडे पुरते दुर्लक्ष झाले. त्यामुळे मंडणगड वासीयांच्या विकासाचा मागासलेला आलेख हा मागासच राहत गेला. त्यामुळे पुन्हा एकदा मुंबई स्थित मंडणगडवासीय पुढे सरसावले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा जोमाने त्यांनी एकत्र येऊन शिवसेना संघटन अधिक मजबूत करण्याचा एकजुटीने निर्धार केला आहे. याची सुरुवात गावी गौरी गणपतीत गावी आल्यावर तालुक्यातील गावागावात जाऊन भेटीगाठी घेऊन नव्या जूण्यांचा मिलाफ घडवून आणि छोटे मोठे सामाजिक, आरोग्य आदी विविध कार्यक्रम राबवून केले जाणार आहे.त्यामुळे पुन्हा एकदा मंडणगड तालुक्यात शिवसेनेचा भगवे वादळ घोंघावणार आहे.
























1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.