loader
Breaking News
Breaking News
Foto

हिवाळे येथे वर्षावास धम्म प्रवचन मालिकेचे तृतीय पुष्प संपन्न

मालवण (प्रतिनिधी) - भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा मालवण, महिला शाखा आणि संस्कार विभाग आयोजित वर्षावास धम्म प्रवचन मालिका २०२६ चे तृतीय पुष्प तृतीय पुष्प - बौद्धांची आचारसंहिताया विषयाच्या अनुषंगाने तालुका संरक्षण उपाध्यक्ष केंद्रीय शिक्षक माजी श्रामणेर, बौद्धाचार्य योगेश वराडकर यांनी गाव शाखा हिवाळे (समाज मंदिर) या ठिकाणी गुंफले. या कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आदर्शांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून, दीप व धूप प्रज्वलन करून करण्यात आली. तदनंतर त्रिसरण पंचशील ग्रहण करण्यात आले. गाव शाखेच्या वतीने उपस्थित सर्व तालुका शाखा पदाधिकाऱ्यांचे स्वागत करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तथागत भगवान बुद्धांचा जो धम्म बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला दिला त्या धम्माचे अनुयायी म्हणून आपले दैनंदिन जीवन कसे असावे, बौद्ध म्हणून आपण कोणत्या आचारसंहिता पाळाव्यात याबाबत योगेश वराडकर यांनी अभ्यासपूर्ण शैलीने मांडणी केली. यावेळी विलास वळंजू, नचिकेत पवार, प्रकाश पवार यांनी कार्यक्रमानिमित्त शुभेच्छा दिल्या तर तालुकाध्यक्ष रविकांत कदम यांनी मनोगत व्यक्त केले.

टाईम्स स्पेशल

या कार्यक्रमाला तालुकाध्यक्ष रविकांत कदम, जिल्हा संस्कार सचिव विलास वळंजू, तालुका सरचिटणीस नचिकेत पवार, कोषाध्यक्ष प्रकाश पवार, संस्कार उपाध्यक्ष सूर्यकांत कदम, तालुका कार्यालयीन सचिव शंकर कदम, संस्कार सचिव मिलिंद पवार, सचिन कासले, तालुका महिला संस्कार उपाध्यक्षा आम्रपाली पवार, हिवाळे गावशाखा अध्यक्ष नितीश पवार, सचिव सागर पवार, कोषाध्यक्ष दिनेश कदम, मुंबई अध्यक्ष विजय पवार, अशोक पवार, संजय पवार, वर्देकर व मोठया प्रमाणावर उपासक-उपासिका उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार संस्कार विभाग उपाध्यक्ष सूर्यकांत कदम यांनी केले. गाव शाखेच्या वतीने नितीश पवार यांनी आभार व्यक्त केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg