loader
Breaking News
Breaking News
Foto

​पर्यटन विकासाला गती देणाऱ्या ताज प्रकल्पासाठी पालकमंत्री नितेश राणे यांचे नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले यांनी मानले आभार

​सावंतवाडी (प्रतिनिधी): सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या अथक प्रयत्नांमुळे जिल्ह्यात आकारास येत असलेल्या प्रतिष्ठित 'ताज' प्रकल्पाबद्दल सावंतवाडीच्या नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले यांनी त्यांचे विशेष आभार मानले आहेत. पालकमंत्री नितेश राणे हे जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी अतिशय वेगाने आणि कटिबद्धतेने प्रयत्न करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

​शिरोडा वेळागर येथील 'ताज ग्रुप'च्या पंचतारांकित हॉटेल प्रकल्पाबाबत बोलताना नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले म्हणाल्या की, हा प्रकल्प प्रत्यक्ष सुरू होण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार यांनी महत्त्वपूर्ण करार केला. हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार दीपक केसरकर या सर्वांनीच सातत्याने पाठपुरावा केला आहे. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमुळेच हा भव्य प्रकल्प सिंधुदुर्गात उभा राहत आहे.

टाईम्स स्पेशल

​आपल्या भावना व्यक्त करताना त्या पुढे म्हणाल्या, "आम्ही स्वतः सावंतवाडी राजवाडा येथे हॉटेल व्यवसाय सुरू केला आहे. त्यामुळे एक लोकप्रतिनिधी (नगराध्यक्ष) आणि एक हॉटेल व्यावसायिक या दोन्ही नात्यांनी मी पालकमंत्री नितेश राणे यांचे मनापासून आभार मानते." ​जिल्ह्यात अशा मोठ्या पंचतारांकित प्रकल्पांमुळे पर्यटनाला मोठी चालना मिळेल आणि स्थानिक रोजगाराच्या संधी वाढतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg