loader
Breaking News
Breaking News
Foto

साखरपा-रत्नागिरी सकाळची एस.टी. बंद, पास धारक प्रवाशांचे हाल

देवळे (प्रकाश चाळके) - साखरपा ते रत्नागिरी अशी नियमित चालू असलेली सकाळची साडेसात वाजताची एस.टी. गेले काही दिवस बंद केल्याने त्या गाडीने नियमित साखरप्यातुन रत्नागिरीकडे जाणाऱ्या कार्यालयीन व विद्यार्थी वर्गाचे मोठे हाल होत असून ही बस त्वरित चालू करावी, अशी मागणी साखरपा परिसरातील व या मार्गाने जाणाऱ्या सर्व प्रवासी वर्गाची आहे. अतिवृष्टीमुळे आंबा घाटातील परिस्थिती व बंद पडलेली वाहतूक त्यामुळे साखरपा ते रत्नागिरी अशी सकाळी ७.३० ला सुटणारी एस.टी.अचानक बंद केल्याने कार्यालयीन कामकाज करणाऱ्या विद्यार्थी वर्ग, आजारी व्यक्ती व इतर कामकाज करणाऱ्या प्रवासी वर्गाचे हाल होत आहेत. हा सर्व रत्नागिरी आगाराचा मनमानी कारभार असून त्याबाबत संताप व्यक्त करण्यात येत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तसेच साखरपा ते रत्नागिरी नेहमी प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडे एस.टी.चा पास असतो मात्र तो पास कोल्हापूर वरून रत्नागिरीकडे जाणाऱ्या एस. टी.वाहकांना चालत नसल्याचे प्रवासी वर्गातून सांगितले जाते. देवरुख आगारातून काढलेला पास कोल्हापुर बसला चालत नसल्याचे येथील प्रवासी वर्गांचे म्हणणे आहे. या बाबत या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवासी वर्गांचा मासिक पास का चालत नाही, याचे कारण काय? याची माहिती मिळणे गरजेचे आहे. वरिष्ठ पातळीवरून याबाबत चौकशी व्हावी, अशी मागणी या मार्गावर जाणाऱ्या पासधारक प्रवासी वर्गातून होत आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg