loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरीत मोकाट गुरांविरोधात पालिकेची धडक मोहीम; एका दिवसात ३४ गुरे ताब्यात

रत्नागिरी - रत्नागिरी शहरात रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्या गुरांमुळे वाहनचालक आणि नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी नगरपालिकेने मोकाट गुरे पकडण्यासाठी धडक मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत काल दिवसभरात तब्बल ३४ मोकाट गुरे पकडण्यात आली. गुरे पकडण्यासाठी नगरपालिकेने पाच ते सहा कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असून शहरातील विविध भागांत ही कारवाई सुरू आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पकडण्यात आलेली गुरे चंपक मैदान येथील कोंडवाड्यात ठेवण्यात आली आहेत. शहरातील रस्ते, बाजारपेठ आणि वर्दळीच्या ठिकाणी मोकाट गुरांचा वावर वाढल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला होता. त्यामुळे पालिकेच्या या मोहिमेमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मोकाट गुरांमुळे होणारा त्रास आणि अपघात रोखण्यासाठी पालिकेची ही कारवाई पुढेही सुरू राहणार का, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg