loader
Breaking News
Breaking News
Foto

लांज्यात मोकाट गुरांवर नगरपंचायतीची कडक कारवाई

लांजा (संजय साळवी) - नगरपंचायत हद्दीत मोकाट गुरांमुळे निर्माण होणार्‍या समस्येला आळा घालण्यासाठी नगरपंचायतीने आता कडक कारवाई सुरू केली आहे. शहरातील रस्त्यांवर मोकाट फिरणारी गुरे पकडण्याची मोहीम हाती घेण्यात आली असून कारवाई केलेली गुरे पुन्हा मोकाट अवस्थेत आढळून आल्यास संबंधित गुरे मालकांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे नगरपंचायत प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले. लांजा शहरात गेल्या काही महिन्यांपासून मोकाट गुरांचा आणि भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

याबाबत नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत चर्चाही करण्यात आली होती. मोकाट जनावरे पकडून नगरपंचायतीच्या सुरक्षित जागेत ठेवल्यानंतरही मालक पुढे आले नाहीत तर अशा जनावरांना गोशाळेत पाठविण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला होता. त्यानुसार आता प्रशासनाने प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू केली असून या अगोदर २५ गुरे पडकून चिपळूण येथे गोशाळेत पाठविण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा मोहीम सुरू कररण्यात आली असून नगरपंचायतीमार्फत पकडण्यात आलेली गुरे संबंधित मालकांना तीन दिवसांच्या आत दंड भरून सोडवून घेता येणार आहेत.

टाईम्स स्पेशल

मात्र निर्धारित मुदतीत गुरे सोडवून न घेतल्यास ती गुरे गोशाळेत वर्ग करण्याची कार्यवाही नगरपंचायतीमार्फत करण्यात येणार आहे. विशेषतः गुरे गोशाळेत वर्ग केल्यानंतर ती सोडवून देण्याबाबत कोणतीही तक्रार अथवा विनंती नगरपंचायतीकडे करता येणार नसल्याचे नगरपंचायतीने स्पष्ट केले आहे. त्यामुळे गुरे रस्त्यावर मोकाट न सोडता संबंधित गुरेमालकांनी आपल्या जनावरांची जबाबदारी घेण्याचे आवाहन नगरपंचायतीकडून करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg