loader
Breaking News
Breaking News
Foto

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रत्नागिरी येथे 22 वे देहदान

रत्नागिरी - कै.अनंत नरहर गोखले, वय -७८ वर्ष, राहणार- लिमये वाडी, कर्ला, रत्नागिरी यांचे दि.२०/०८/२०२६ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. कै.अनंत गोखले यांनी भारतीय संरक्षण दलात काम केलेले आहे. त्यांचे कुटुंबीय यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रत्नागिरी येथील वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी व संशोधनासाठी देहाचा उपयोग व्हावा, या उद्देशाने देहदान केले. कै.अनंत गोखले व त्यांच्या कुटुंबीयांच्या इच्छेनुसार त्यांचे मरणोत्तर देहदान दि.२०/०८/२०२६ रोजी करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सदर मरणोत्तर देहदान वेळी कै.अनंत गोखले यांची मुलगी रुपाली लिमये, जावई मंदार लिमये तसेच राजीव लिमये, मिताली भिडे, दिनेश आगाशे, शिरीष सोहोनी व मित्र परिवार उपस्थित होते. सदर देहदानासाठी समीर करमरकर यांचे देखील मोलाचे सहकार्य लाभले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रत्नागिरीचे अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधिष्ठाता डॉ. रामा भोसले तसेच शरीररचनाशास्त्र विभागप्रमुख डॉ. सादिकअली सय्यद, डॉ.योगिता कांबळे, समाजसेवा अधीक्षक रेशम जाधव व शरीरचनाशास्त्र विभागातील पूर्वा तोडणकर, भूमी पारकर, प्रियल आडीवरेकर, मिथिलेश मुरकर, मिहीर लोंढे, राज पेडणेकर, श्रेयश जोशी, श्रीपाद गांधी तसेच वाहन चालक प्रणय पाटील यांनी काम पाहिले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg