loader
Breaking News
Breaking News
Foto

मराठा क्रांती स्वराज्य संघटना तर्फे स्वातंत्रदिनी डोंबिवली येथे "स्वातंत्र्यता चषक! भव्य फुटबॉल स्पर्धेच आयोजन - प्रकाशराव चव्हाण

कल्याण (प्रतिनिधी) - मराठा क्रांती स्वराज्य संघटना राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले, राष्ट्रीय अध्यक्ष सुरत येथील उद्योजक विजयराव कदम, राष्ट्रीय सरचिटणीस बडोद्याचे उद्योजक प्रदीपभाई मोरे, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष गुरुनाथ यशवंतराव, राज्य सरचिटणीस प्रकाशराव चव्हाण, राष्ट्रीय मिडिया अध्यक्ष अभिजित दरेकर, राष्ट्रीय रोजगार उद्योग विभाग अध्यक्ष उद्योजक अजय तिडके यांच्या सुचनेनुसार डोंबिवली येथे भव्य फुटबॉल स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त्यात नामवंत १५ संघानी सहभाग घेतला, असे मराठा क्रांती स्वराज्य संघटना राज्य सरचिटणीस प्रकाशराव चव्हाण यांनी सांगितले. महाराष्ट्र युनायटेड फुटबॉल असोशियन, सौरभ विजय चव्हाण आणि सहकारी, मराठा क्रांती स्वराज्य संघटना, तसेच महाराष्ट्र युनायटेड फुटबॉल असोशियन यांच्या संयुक्त विद्यमाने हा भव्य स्पर्धेचे आयोजन केले होते. यात १५ संघानी सहभाग घेत १०५ खेळाडूंनी भाग घेतला, असे बोलताना प्रकाशराव चव्हाण यांनी सांगितले.

टाईम्स स्पेशल

मराठा क्रांती स्वराज्य संघटना तर्फे सर्व देशभर विविध क्षेत्रात घोडदौड सुरू आहे. राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले यांच्या नेतृत्वाखाली सर्वत्र विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येत असल्याचे राज्य सरचिटणीस प्रकाशराव चव्हाण यांनी सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg