loader
Breaking News
Breaking News
Foto

एलआयसी मालवण शाखेला विद्यार्थ्यांची क्षेत्रभेट, करिअरच्या विविध संधींबाबत मार्गदर्शन

मालवण (प्रतिनिधी) - मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय, मालवणच्या अकाऊंटन्सी व कॉमर्स विभागाच्या वतीने एफ.वाय.बी.कॉम, एस.वाय.बी.कॉम. आणि टी.वाय.बी.कॉम.च्या विद्यार्थ्यांसाठी भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (LIC) मालवण शाखेला क्षेत्रभेट आयोजित करण्यात आली. या क्षेत्रभेटीत वाणिज्य विभागाच्या एकूण १०३ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

एलआयसीच्या प्रशासकीय अधिकारी हिना मुल्ला आणि सागर सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करून एलआयसीच्या कार्यपद्धतीची माहिती दिली. सागर सूर्यवंशी यांनी एलआयसीमधील प्रशासकीय क्षेत्रातील करिअरच्या विविध संधी, त्यासाठी आवश्यक असलेल्या विविध परीक्षा, कौशल्ये व पात्रता याबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. एलआयसीचे विकास अधिकारी शैलेश पावसकर यांनी विद्यार्थ्यांना विकास अधिकारी तसेच एलआयसी एजंट म्हणून उपलब्ध असलेल्या करिअरच्या संधींची माहिती दिली. विद्यार्थ्यांना मालवण शाखेतील विविध विभाग प्रत्यक्ष दाखवून प्रत्येक विभागाचे कामकाज कशा पद्धतीने चालते, याचे सविस्तर विश्लेषण केले. विकास अधिकारी शुभम गावडे यांनीही या उपक्रमात सहभाग घेतला.

टाईम्स स्पेशल

यावेळी एलआयसीचे मुख्य आयुर्विमा सल्लागार दत्ताराम सावंत, बख्तियार खान, जगदीश खराडे, सच्चिदानंद गोलतकर तसेच विमा प्रतिनिधी सागर रेडकर व किरण वस्त उपस्थित होते. विद्यार्थ्यांना क्षेत्रभेटीची संधी उपलब्ध करून देऊन सविस्तर मार्गदर्शन केल्याबद्दल अकाऊंटन्सी विभागप्रमुख डॉ. सुमेधा नाईक यांनी एलआयसी मालवण शाखेचे तसेच उपस्थित सर्व पदाधिकारी व अधिकाऱ्यांचे आभार मानले. या क्षेत्रभेटीचे आयोजन डॉ. सुमेधा नाईक, डॉ. देविदास हारगिले, प्रा. रामचंद्र तावडे, प्रा. योगिता सावंत, प्राची गावडे आणि दुर्वा चव्हाण यांनी केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg