कोल्हापूर: "कोल्हापूर येथील मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ म्हणजे छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या सामाजिक समतेला दिलेले एक भव्य अभिवादन आहे," असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश भूषण गवई यांनी केले. कोल्हापुरात आयोजित उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर करवीर सर्किट बेंचच्या प्रथम वर्धापन दिन समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. भूषण गवई पुढे म्हणाले की, "माजी न्यायमूर्ती टी. व्ही. नलावडे यांनी पहिल्यांदा मला या खंडपीठाची संकल्पना सांगितली होती. त्यानंतर अँड. विवेक घाडगे यांनी या मागणीसाठी सातत्याने आग्रह धरला. आज सहा जिल्ह्यातील वकिलांच्या न्याय्य हक्कासाठीची ही मोठी मागणी पूर्ण झाली असून, हे खंडपीठ सर्वसामान्यांसाठी न्यायाची दारे खुली करेल."या ऐतिहासिक सोहळ्याला मुंबई उच्च न्यायालयाचे कार्यवाहक मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते. ते म्हणाले, "माणूस कितीही समृद्ध असला, तरी जोपर्यंत त्याला वेळेवर न्याय मिळत नाही, तोपर्यंत त्याच्या आयुष्याला खरा अर्थ उरत नाही. महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समतेचा जो लढा दिला, त्याला न्यायमूर्ती गवई यांनी अंतिम स्वरूप दिले आहे. राज्य सरकारने यासाठी ७५ एकर जागा आणि ६५ पदांना दिलेली मंजुरी ही एक आश्वासक पाऊल असून, सरकारच्या सकारात्मकतेचे हे लक्षण आहे."
यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे वरिष्ठ प्रशासकीय न्यायमूर्ती ए. एस. गडकरी, कनिष्ठ प्रशासकीय न्यायमूर्ती जी. एस. कुलकर्णी, न्यायमूर्ती बी. पी. कोलाबावाला, न्यायमूर्ती सुमन श्याम, कोल्हापूरचे खासदार छत्रपती शाहू महाराज आणि पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांची विशेष उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचच्या ज्येष्ठ न्यायमूर्ती शर्मिला यू. देशमुख यांनी भूषवले.न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, "गेल्या चाळीस वर्षांच्या अभूतपूर्व लढ्याला आज या खंडपीठामुळे यश मिळाले आहे. न्यायमूर्ती भूषण गवई यांचे योगदान कोल्हापूरच्या इतिहासात अजरामर राहील आणि त्यांचे नाव प्रत्येक वकील व पक्षकाराच्या हृदयात कायमचे कोरले जाईल."या कार्यक्रमाच्या आयोजनात अँड. राजेंद्र मांडलिक, अँड. विवेक घाडगे, अँड. तेजपाल इंगळे, अँड. संग्राम देसाई, अँड. श्रीकृष्ण गणबावले आणि अँड. मिलिंद थोबडे यांसह कृती समिती व बार असोसिएशनच्या सदस्यांनी मोलाची भूमिका बजावली. या सोहळ्यामुळे कोल्हापूरच्या कायदेशीर प्रवासात एका नव्या युगाची सुरुवात झाली आहे.




















































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)

























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.