नवीदिल्ली : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दिल्लीतील संसद मार्ग पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या डीसीपी (DCP) कार्यालयाबाहेर पीडित विद्यार्थ्यासोबत धरणे आंदोलन सुरू केले आहे.नीट (NEET) पेपरफुटी आणि परीक्षांमधील अनियमिततेविरोधात जंतर-मंतर येथे कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP) 'चलो संसद' आंदोलनादरम्यान, साहिल लोचव नावाचा विद्यार्थी पेलेट गन लागल्याने जखमी झाला होता. या प्रकरणी अद्याप एफआयआर (FIR) नोंदवला न गेल्याने राहुल गांधी थेट डीसीपी ऑफिसमध्ये पोहोचले.
२० जुलै रोजी विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान पोलीस आणि आंदोलकांमध्ये संघर्ष झाला होता. पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी लाठीचार्ज आणि अश्रूधुराचा वापर केला, ज्यामध्ये साहिल गंभीर जखमी झाला. संसदेच्या पावसाळी अधिवेशनातही राहुल गांधींनी पेलेट गनच्या वापराचा मुद्दा उपस्थित केला होता.राहुल गांधी आज स्वतः जखमी विद्यार्थी साहिलला सोबत घेऊन संसद मार्ग पोलीस ठाण्यात आणि नंतर डीसीपी कार्यालयात गेले. या प्रकरणाचा तपास कुठपर्यंत आला आहे, याची माहिती त्यांनी मागितली.
काँग्रेसचा आरोप आहे की हा दखलपात्र गुन्हा (Cognisable Offence) असूनही दिल्ली पोलिसांनी अजून गुन्हा (FIR) नोंदवलेला नाही. तसेच या प्रकरणाचा तपास अधिकारी (Investigation Officer - I/O) कोण आहे आणि त्याचा आयडी नंबर काय आहे, याची कोणतीही माहिती डीसीपींनी दिलेली नाही. "एफआयआर नाही, तर न्यायही नाही; म्हणून आम्ही इथेच बसणार", असे म्हणत राहुल गांधींनी डीसीपी कार्यालयाबाहेरच साहिलसोबत धरणे आंदोलन (ठिय्या) सुरू केले आहे. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत तिथून हलणार नसल्याचा इशारा काँग्रेसने दिला आहे.
























1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.