पुणे, : घोषणा शिट्ट्या अन् टाळ्यांचा पाऊस, पुण्यातल्या सभेत राहुल गांधींची तुफान क्रेझ पाहायला मिळाली. या सभेमध्ये अनेक मुलींनी मंचावर जाऊन अडचणी मांडल्या. भारताची सर्वात मोठी ताकद आहे, देशात ७० कोटी महिला आहेत. त्यांच्या कल्पना, स्वप्ने आहेत. तीच देशाची खरी संपत्ती आहे, असे राहुल गांधी म्हणाले. मात्र देशाचं आजचं वास्तव मांडताना महिला अत्याचाराचे हादरवणारे आकडे त्यांनी समोर ठेवले. मनुस्मृतीने महिलांना ३ चौकटीत बसवलं. महिलांना स्वातंत्र्य नाही असा मनुस्मृतीचा विचार असं ते म्हणाले. राहुल गांधी यांनी आजच्या कार्यक्रमात महिला सक्षमीकरण आणि त्यांच्या स्वातंत्र्याच्या मुद्द्यावर भर दिला. शेकडो महिलांच्या उपस्थितीत त्यांनी पिंजरा तोडा असे आवाहन करत, महिलांनी त्यांच्यातील अद्वितीय क्षमता ओळखून सामाजिक बंधनातून मुक्त व्हावं, असं सांगितलं. यावेळी जेन जीने राहुल गांधींना ‘पुन्हा पुण्यात या’ असं आग्रहाचं निमंत्रण दिलं. राहुल गांधीनीही हे आमंत्रण स्वीकारले. ‘पुणे म्हणजे प्रेम’ हा मंत्र यावेळी पुणेकरांनी दिला. राहुल गांधीनीही मराठी भाषेत तो मंत्र उच्चारताच एकच जल्लोष झाला. राहुल गांधी यांनी आपल्या भाषणाची सुरूवात करताना म्हटले की, आजच्या कार्यक्रमाचा उद्देश मंचावर लिहिल्याप्रमाणे ब्रेक द केज (पिंजर्यातून बाहेर पडा) असं आहे. मला प्रथम तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की, तुम्हा सर्वांना तुमच्या जीवनात वेगवेगळ्या गोष्टी सांगितलेल्या असतील. यात काही चांगल्या, काही वाईट गोष्टींचा समावेश असेल. तुम्हाला रस्त्यांवरून चालताना कधी भीती वाटली असेल. पण आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो. तुमच्यापैकी प्रत्येकजण हा या जगात वेगळा आहे. मी तुमच्यासारखा दुसरा व्यक्ती शोधण्याचा प्रयत्न केला तर तो मला सापडणार नाही. तुम्ही युनिक आहात, तुमच्याकडे तुमच्या जीवनासाठी स्वप्ने आहेत.
राहुल गांधी यांनी आपल्या सभेचे स्वरुप संवादात्मक ठेवले होते. या सभेमध्ये अनेक मुलींनी मंचावर जाऊन अडचणी मांडल्या. काही मुलींनी घरातून होत असलेली अडवणूक, रस्त्यावर फिरताना काढली जाणारी छेड, शिक्षणासाठी करावा लागणारा संघर्ष यावर याबाबत सांगितले. दुसरीकडे राहुल गांधी यांनीदेखील तरुणींना, मुलींना पुढे जाण्यासाठी संधी मिळाली पाहिजे, असे मत व्यक्त केले. तसेच सध्या देशात महिलांची स्थिती खूप गंभीर असल्याचे सांगताना काही आकडेवारी सांगितली. राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात तसेच तरुणींसोबतच्या संवादात एक पीपीटीही सादर केली. या पीपीटीत त्यांनी भारतातील महिला हिंसाचाराचे आकडे मांडले. देशात अनेक ठिकाणी महिलांवर लैंगिक अत्याचार होतात. हिंसाचार होतो. परंतु बर्याच प्रकरणांची नोदं होत नाही, अशी चिंता यावेळी राहुल गांधींनी व्यक्त केली. देशात मुली जन्मन्याआधीच प्रत्येक वर्षी साडे चार लाख मुलगी अर्भकांची हत्या केली जाते. या सभेला आलेल्या साधारण ८० टक्के मुलींचा विनयभंग करण्यात आलेला आहे. हा विनयभंग शाळा, कॉलेज, बसमध्ये, रस्त्यावर, रेस्टॉरंटमध्ये होतो. साधारण २९ टक्के महिलांवर शारीरिक हिंसाचार होतो. घरी, रस्त्यावर महिलांना मारले जाते. सोबतच १०० पैकी ६ महिलांवर भारतात बलात्कार होतो, अशी धक्कादायक आकडेवारी राहुल गांधी यांनी मांडली. या कार्यक्रमाचं औचित्य साधत स्टेजवर राहुल गांधींचा दोन मुलींशी संवाद झाला. यावेळी एका मुलींनी आपल्या व्यथा काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासमोर मांडल्या. मी माझ्या वडिलांना तीन वर्षांपूर्वी गमावलं आहे. त्यावर राहुल गांधींनी पटकन विचारलं कसं काय? तेव्हा ती म्हणाली की माझ्या वडिलांना कॅन्सर झाला होता. माझे वडील स्वच्छता कर्मचारी होते. त्यांच्यावर समाजाचं आणि नातेवाईकांचं बरंच प्रेशर होतं. त्यांच्या जाण्यानंतर मी काही बोलायची तर घरात मी काहीतरी मागत आहे असंच प्रत्येकाला वाटायचं. जर हे माझ्या भावाने सांगितलं तर त्याचा हक्कच आहे, असं समजलं जात होतं. पण मी सांगितलं तर हिस्सेदारी मागत असल्याचं वाटायचं. त्यानंतर मी शिक्षण घेऊन आले तेव्हा माझ्यावर लग्नाचं प्रेशर वाढलं. त्यातही लग्नासाठी सुंदर वगैरे मुलगी असावी असं दिसून आलं. तेव्हा राहुल गांधींनी पटकन तिला थांबवलं आणि म्हणाले की, ‘तू खूप सुंदर मुलगी आहेस.’
विद्यार्थिनीने व्यथा मांडताना पुढे सांगितलं की, मी शिक्षित असूनही मला या सगळ्यांना तोंड द्यावं लागतं. त्यावर राहुल गांधींनी आपलं म्हणणं मांडलं आणि सांगितलं की, तुम्हाला असं वाटतं का की पुरूषांनी तुमच्यावर नियंत्रण ठेवावं. तेव्हा गर्दीतून जोरदारपणे ‘नाही’ असं प्रत्युत्तर आलं. त्यानंतर राहुल गांधींनी महिलांवर कसे अत्याचार होतात? याबाबत विश्लेषण केलं. मुलींना जन्मापासून अत्याचार सहन करावे लागतात. भ्रूण हत्या केली जाते, त्यानंतर सार्वजनिक ठिकाणी वावरताना छेडछाड केली जाते. मारहाण केली जाते. हिंसाचारापासून संरक्षण व्हावं यासाठी मुली जॉब किंवा शिक्षण सोडून देतात. या सर्व मुलींच्या मनातील व्यथा त्यांनी व्यासपीठावर मांडल्या. राहुल गांधी यांनी पुढे बोलताना म्हटले की, ‘अनेकदा लोक मला विचारतात की भारताची सर्वात मोठी ताकद काय आहे? याची तुम्हाला अनेक उत्तरे मिळतील. कोण म्हणेल आपली अर्थव्यवस्था, कुणी म्हणेल आपले सैन्य, कुणी म्हणेल आपले वैद्यकीय क्षेत्र, काहीजण म्हणतील आपले नागरिक, पण भारताची सर्वात मोठी ताकद आहे, ७० कोटी महिला, त्यांच्या कल्पना, स्वप्ने आहेत. महिला नैसर्गिकरित्या जास्त सेन्सेटिव्ह, जास्त जेंटल असतात आणि त्यांना पुरूषांच्या तुलनेत जास्त सहानुभूती असते. त्यामुळेच मला विश्वास आहे की, महिला म्हणजे त्या तरूणी असोत, वृद्ध असोत त्या भारताची ताकद आहेत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून राहुल गांधी यांनी दिलखुलास संवाद साधला. पुण्यातील या कार्यक्रमाला मुलींची, महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. तरुणींच्या भविष्याबद्दल बोलताना राहुल गांधी यांनी काँग्रेसचं व्हिजनही सांगितलं. महिला या देशाची सर्वात मोठी ताकद आहे, असं म्हणत राहुल गांधी यांनी आजच्या कार्यक्रमात महिला सक्षमीकरण आणि त्यांच्या स्वातंत्र्याच्या मुद्द्यावर भर दिला. शेकडो महिलांच्या उपस्थितीत त्यांनी पिंजरा तोडा असे आवाहन करत, महिलांनी त्यांच्यातील अद्वितीय क्षमता ओळखून सामाजिक बंधनातून मुक्त व्हावं, असं प्रतिपादन केलं. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ‘छात्रों की गुंज’ कार्यक्रमात मनुस्मृतीपासूनचे दाखले देत महिलांना भारतीय समाजात कसे दमनाला सामोरे जावे लागते याचा दाखले दिले. राहुल गांधी नेहमी पांढरा टीशर्ट परिधान करत असतात. त्यांनी प्रयागराज येथे राहुल गांधी यांनी गुलाबी रंगाचा शर्ट परिधान केला होता. तर पुण्यात त्यांनी पिवळ्या रंगाचा शर्ट परिधान केला होता. या कार्यक्रमाला मुलांच्यापेक्षा मुलींची जास्त उपस्थिती आहे, असे राहुल गांधी यांनी स्टेजवर येताच जाहीर केले आणि मुलींनी आपल्या मोबाईल फोनची फ्लॅश लाईट दाखवत त्यास दुजारो दिला.

























1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.