loader
Breaking News
Breaking News
Foto

मणेरी ग्रामपंचायतजवळ कारला अचानक आग; चालकाच्या प्रसंगावधानामुळे जीवितहानी टळली

दोडामार्ग, (प्रतिनिधी) : कुडासा येथे जात असताना मणेरी ग्रामपंचायतीजवळ एका कारला अचानक आग लागल्याची घटना बुधवारी सायंकाळच्या सुमारास घडली. या घटनेत कारचे मोठे नुकसान झाले असून, चालकाने वेळीच प्रसंगावधान राखून कारमधून बाहेर पडल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित चालक कारमधून एकटाच कुडासाच्या दिशेने जात होता. मणेरी ग्रामपंचायतीजवळ आल्यानंतर कारमध्ये काहीतरी बिघाड झाल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यानंतर कारला आग लागल्याचे निदर्शनास येताच चालकाने प्रसंगावधान राखत तातडीने कारमधून बाहेर पडत सुरक्षित अंतर गाठले. काही वेळातच आगीने कारला पूर्णपणे वेढले. रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी परिसरात मोठी गर्दी झाली होती. आगीमुळे कारचे मोठे नुकसान झाले.

टाईम्स स्पेशल

कारमध्ये शॉर्टसर्किट झाल्यामुळे आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, आगीचे नेमके कारण अधिकृत तपासणीनंतरच स्पष्ट होणार आहे. दरम्यान, कारला आग लागल्याचे वेळीच लक्षात आल्याने चालकाने घेतलेल्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली. या घटनेमुळे मणेरी परिसरात काही काळ खळबळ उडाली होती.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg