loader
Breaking News
Breaking News
Foto

गोळवली-धामणी मार्गावरून महामार्गावर ये-जा करणाऱ्या वाहनांसाठी क्रॉसिंग रोडच्या कामाला सुरुवात

संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - खाडीपट्ट्यातील कुंभारखाणी, धामापूर, मावळंगे आदी भागातून मुंबई-गोवा महामार्गावर येणाऱ्या वाहनांसाठी क्रॉसिंग रोडची सुविधा नसल्याने वाहनचालकांना मोठ्या धोक्याचा सामना करावा लागत होता. ही समस्या लक्षात घेऊन सामाजिक कार्यकर्ते प्रसाद आमकर तसेच माजी पोलीस पाटील आप्पा पाध्ये यांनी महामार्ग ठेकेदार कंपनीकडे क्रॉसिंग रोड उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. पूर्वीच्या क्रॉसिंगपर्यंत जाण्यासाठी वाहनांना महामार्गावरून धोकादायक पद्धतीने मार्गक्रमण करावे लागत होते. त्यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली होती. याबाबत ग्रामस्थांनीही चिंता व्यक्त केली होती. ग्रामपंचायतीने ठराव मंजूर करून संबंधित ठिकाणी क्रॉसिंग रोड देण्याची मागणी केली होती.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

ग्रामस्थांची मागणी आणि वाहनचालकांची सुरक्षितता लक्षात घेऊन महामार्ग ठेकेदार कंपनीने सकारात्मक भूमिका घेतली असून, बुधवारी दुपारपासून नवीन क्रॉसिंग रोडच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. यामुळे धामापूर -मावळंगे मार्गे महामार्गावर ये-जा करणाऱ्या वाहनांना सुरक्षित मार्ग उपलब्ध होणार आहे. क्रॉसिंग रोडच्या कामाला सुरुवात झाल्याने परिसरातील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले असून, मागणीची दखल घेतल्याबद्दल संबंधित ठेकेदार कंपनीचे आभार मानले आहेत.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg