loader
Breaking News
Breaking News
Foto

क्रांतिकारकांनी आचरणात आणलेले गुण आचरणात आणा, भूषण साटम यांचे प्रतिपादन

मालवण (प्रतिनिधी) - ब्रिटिशांच्या जुलमी शृंखलात जखडलेल्या भारतमातेला मुक्त करण्यासाठी ज्या क्रांतीकारकांनी आपल्या प्राणाची आहुती देत आपल्यासमोर संघटन, कठोर राष्ट्रप्रेम, एकात्मता, शिस्तपालन, वज्रनिश्चय, गुरुजनाचा आणि आपल्या संस्कृतीचा, धर्माचा अभिमान या सर्व गोष्टी ठेवल्या त्याच गोष्टी दुर्दैवाने लुप्त होतं आहेत. आज भारत देश पुन्हा एकदा सुजलाम, सुफलाम बनवायचा असेल तर क्रांतिकारकांनी आचरणात आणलेले गुण आचरणात आणावेत असे प्रतिपादन श्री शिवराज मंच अध्यक्ष आणि शिवशंभो विचार मंच कोकण प्रांतचे सहसंयोजक भूषण साटम यांनी येथे बोलताना केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कट्टा येथील वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टा मालवण येथे क्रांती दिनानिमित्त विद्यार्थ्यांना क्रांतिकारकांच्या बलिदानाची जाणीव व्हावी या हेतूने विद्यार्थ्यांसाठी इतिहास अभ्यासक आणि शिवशंभो विचार मंच कोकण प्रांतचे सहसंयोजक श्री भूषण साटम यांचे भारतीय स्वातंत्र्यलढ्यामध्ये क्रांतिकारकांचे योगदान या विषयावर मार्गदर्शन व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. तसेच इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg