loader
Breaking News
Breaking News
Foto

ना. योगेशदादा कदम यांच्या हस्ते युवासेना खेड तालुका गुहागर विधानसभा क्षेत्र मर्यादित विविध पदाधिकारी नियुक्त्या

खेड (दिलीप देवळेकर) - शिवसेना मुख्यनेते एकनाथ शिंदे, शिवसेना जेष्ठ नेते रामदासभाई कदम यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री नामदार योगेशदादा रामदासभाई कदम यांच्या प्रेरणेने, युवासेना तालुकाप्रमुख सुरज रेवणे यांच्या पुढाकारणे आज युवासेना खेड तालुका गुहागर विधानसभा क्षेत्र मर्यादित विविध पदाधिकारी नियुक्त्या नव्याने करण्यात आल्या. या निवडीमधे गुणदे पंचायत समिती गणाच्या युवासेना विभागप्रमुख पदी प्रथमेश भोसले, लवेल शाखाप्रमुख प्रणित मोगरे, आवाशी शाखाप्रमुख मंदार आंब्रे, संगलट मोहल्ला शाखाप्रमुख पदी नदीम नाडकर, संगलट मराठावाडी आकाश चिणकटे, सुसेरी नंबर १ शाखाप्रमुख कैलास दळवटकर, आवाशी उपशाखाप्रमुख सुरज फावरे यांची नियुक्ती करुन शिवसेना युवासेना वाढीसाठी अजूनच बळकटी मिळणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सदर निवडी दरम्यान तालुकाप्रमुख अरविंद चव्हाण, सभापती अफिया पालेकर, जिल्हा परिषद सदस्या रेवती पाटील, पंचायत समिती सदस्य निसार सुर्वे, शिवसेना गुहागर विधानसभा संपर्कप्रमुख राजेंद्र आंब्रे, शिवसेना गुहागर विधानसभा संघटक चंद्रकांत चाळके, युवतीसेना जिल्हाप्रमुख सिद्धी शिंदे, युवासेना तालुका सचिव अमोल आंब्रे, दीपेश निकम, युवासेना गुहागर विधानसभा समन्वयक सागर आंब्रे, युवासेना उपतालुकाप्रमुख आदर्श आंब्रे, युवासेना आंबडस पंचायत समिती गण विभागप्रमुख रघुनाथ सुर्वे, युवासेना लोटे पंचायत समिती गण विभागप्रमुख अजित कदम, युवासेना धामणदेवी पंचायत समिती गण विभागप्रमुख आदिल मिठागिरी, युवासेना शिव पंचायत समिती गणाचे विभागप्रमुख सौद कामिल रावल, युवासेना भोस्ते पंचायत समिती गण विभागप्रमुख प्रशांत चांदणे, युवासेना दयाळ पंचायत समिती गणाचे विभागप्रमुख ओंकार शिगवण, युवासेना पन्हाळजे पंचायत समिती गणाचे विभागप्रमुख इसा सुर्वे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg