loader
Breaking News
Breaking News
Foto

पाळये गावात जंगली हत्तींचा उपद्रव, लाखोचे नुकसान; शेतकरी आक्रमक

दोडामार्ग, (प्रतिनिधी) - राज्य सरकार वन विभाग कडून जंगली हत्ती बंदोबस्त करायला जाणूनबुजून टाळाटाळ करत आहेत. यामुळे दोडामार्ग तालुक्यातील बागायतदार शेतकरी देशोधडीला लागला आहे. आपल्या पुढील पिढीचा विचार करून अनेक शेतकरी फळझाडे, शेती करत आहेत. पण गेल्या २३ वर्षापासून दोडामार्ग तालुक्यातील तिलारी खोर्‍यातील अनेक गावातील शेतकरी हत्ती संकट यामुळे हैराण झाले आहेत. गुरुवारी रात्री हत्ती कळपाकडून पाळये गावात मोठया प्रमाणात नुकसान केले आहे. हत्ती नुकसान करत असताना वन कर्मचारी केवळ बघ्याची भूमिका घेत आहेत. यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत. तुमची कवडीमोल भरपाई नको, आम्हाला जगू दे, शेती बागायती करू दे, हत्ती बंदोबस्त कायमस्वरूपी करा अन्यथा रस्त्यावर उतरावे लागेल असा गंभीर इशारा नारायण दळवी यांनी दिला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg