loader
Breaking News
Breaking News
Foto

फिशिंग रॉडच्या साहाय्याने मासेमारी करण्यासाठी आलेल्या दोन इसमांचा बुडून दुर्दैवी मृत्यू

वेळणेश्वर (उमेश शिंदे) - गुहागर तालुक्यातील बुधल बीचवर दोन मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. फिशिंग रॉडच्या सहाय्याने मासेमारी करत असताना हे दोन्ही इसम समुद्राच्या पाण्यात वाहून गेल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हे दोन्ही दुर्दैवी इसम चिपळूणमधील गोवळकोट परिसरातील रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

हे इसम बुधल बीचच्या खडकाळ भागात किंवा किनार्‍यावर फिशिंग रॉड घेऊन मासेमारीसाठी आले होते. मात्र, याच दरम्यान समुद्राच्या लाटांचा किंवा पाण्याच्या वेगाचा अंदाज न आल्याने ते वाहून गेले आणि त्यांचा बुडून मृत्यू झाला. या घटनेची माहिती बुधल गावातील स्थानिक ग्रामस्थांना मिळताच, त्यांनी अत्यंत सतर्कता दाखवत तात्काळ गुहागरचे सभापती प्रणव पोळेकर यांच्याशी संपर्क साधला. घटनेची माहिती मिळताच प्रणव पोळेकर यांनी कोणतीही वेळ न गमावता अवघ्या काही मिनिटांतच घटनास्थळ गाठले.

टाईम्स स्पेशल

त्यांनी तातडीने पोलीस आणि इतर प्रशासकीय यंत्रणांना फोन करून घटनेची माहिती दिली आणि त्यांना तातडीने घटनास्थळी बोलावून घेतले. सध्या पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून, दोन्ही मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. पंचनामा आणि पुढील कायदेशीर कार्यवाही सध्या पोलिसांकडून सुरू आहे. मासेमारीचा छंद या दोन तरुणांच्या जीवावर बेतल्याने चिपळूण आणि गुहागर परिसरात सध्या प्रचंड हळहळ व्यक्त केली जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg