loader
Breaking News
Breaking News
Foto

घोटगेवाडी कॉजवेवरून दोघे वाहुन गेल्यानंतर जलसंपदा विभागाकडून सुरक्षारक्षक तैनात

दोडामार्ग, (प्रतिनिधी) - घोटगेवाडी कॉजवेवरून पावसाळ्यात सतत पाणी वाहत असत, काही वेळा धरणातून पाणी विसर्ग कमी झाला की घोटगेवाडी कॉजवेवरून ये जा करता येते. पाणी असताना प्रवास करू नका असे आवाहन करून देखील काहीजण जीव धोक्यात घालून प्रवास करतात.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तीन दिवसांपूर्वी छत्तीसगढ राज्यातील युवक मुलगा घोटगेवाडी कॉजवेवरून कोनाळकट्टा येथे आले होते तेव्हा पाणी कमी होते पण काही वेळाने हे दोघे कॉजवेवरून पाणी असताना परत जात होते यावेळी पाणी प्रवाह वाढला आणि हे दोघे वाहुन गेले होते. यामुळे नागरीकांनी जलसंपदा विभाग अधिकारी यांना दोन्ही बाजूंनी गेट घाला किंवा तातडीने दोन्ही बाजूंनी सुरक्षा रक्षक तैनात करा अशी मागणी केली होती. अखेर गुरुवारी घोटगेवाडी कॉजवेच्या ठिकाणी सुरक्षा रक्षक तैनात केले. यामुळे दुर्घटना रोखणे शक्य होणार आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg