loader
Breaking News
Breaking News
Foto

नांदगावमध्ये कृषी ज्ञानाचा जागर; कृषिकन्यांनी भरविले आकर्षक कृषी प्रदर्शन

नांदगाव, (वार्ताहर) : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून शरदचंद्र पवार कृषी महाविद्यालय, खारवते दहिवली येथील कृषिकन्यांनी नांदगाव ग्रामपंचायतीमध्ये कृषी प्रदर्शनाचे आयोजन करून शेतकर्‍यांना आधुनिक व शाश्वत शेतीविषयक ज्ञानाची अनोखी पर्वणी दिली. या प्रदर्शनामध्ये कृषी क्षेत्रातील विविध नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान, साधने व उत्पादन पद्धतींचे आकर्षक पद्धतीने सादरीकरण करण्यात आले. कृषी अवजारे, विविध कृषी मॉडेल्स, सेंद्रिय खते, गांडूळखत, आळंबी उत्पादन, विविध पिकांचे बियाणे व बियाणे संकलन यांसह अनेक कृषीविषयक बाबींची माहिती शेतकर्‍यांना देण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शेतकर्‍यांनी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध स्टॉल्सची पाहणी केली. कृषिकन्यांनी प्रत्येक विषयाची माहिती सोप्या व प्रभावी पद्धतीने समजावून सांगत शेतकर्‍यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. कमी खर्चात, पर्यावरणपूरक आणि शाश्वत पद्धतीने शेती करण्यासाठी उपलब्ध तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा, याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमास तंटामुक्त समितीचे अध्यक्ष चंद्रकांत घाग यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांनी प्रदर्शनाची पाहणी करून कृषिकन्यांनी केलेल्या उपक्रमाचे कौतुक केले. या कृषी प्रदर्शनाचे यशस्वी आयोजन कृषिकन्या तन्वी सुर्वे, पायल केळकर, सृष्टी देसाई, अर्णवी जाधव, अंजली कुंडेकर आणि स्नेहल बर्गे यांनी केले. कृषी ज्ञान शेतकर्‍यांच्या दारी या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनामुळे शेतकर्‍यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती मिळाली असून, विद्यार्थिनींच्या प्रत्यक्ष कृषी विस्तार कार्याला देखील एक नवी दिशा मिळाली.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg