दापोली (सागर गोवळे) : कृषी महाविद्यालय, दापोली येथील रावे उपक्रमांतर्गत ‘कृषी संगिनी’ व ‘संजीवनी’ समूहांच्या संयुक्त विद्यमाने साखळोली नं. २ येथे ‘रानमाया’ प्रदर्शन व पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. पारंपरिक खाद्यसंस्कृती, रानभाज्यांचे संवर्धन, पोषणमूल्ये आणि ग्रामीण चव जपण्याच्या उद्देशाने आयोजित या उपक्रमाला ग्रामस्थ आणि मान्यवरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाचे उद्घाटन साखळोलीच्या सरपंच शामल लांजेकर यांच्या हस्ते झाले. रानभाज्यांचे संवर्धन व प्रचार-प्रसार करण्याचे महत्त्व अधोरेखित करत त्यांनी विद्यार्थ्यांच्या उपक्रमाचे कौतुक केले.
प्रदर्शनात तब्बल ४० रानभाज्यांचे नमुने त्यांची ओळख, औषधी गुणधर्म आणि पोषणमूल्यांच्या माहितीसह मांडण्यात आले होते. पाककला स्पर्धेत स्थानिक रानभाज्यांचा वापर करून बनवलेले ३५ चविष्ट व आरोग्यदायी पदार्थ सादर करण्यात आले. रानभाज्यांमुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढते आणि नव्या पिढीला याची ओळख होणे गरजेचे असल्याचे मत कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रवीण झगडे यांनी मांडले. या स्पर्धेत प्रथम क्रमांक स्मिता पडवेकर (केळीच्या कोक्याचे मोदक व आळंबीची भाजी), द्वितीय क्रमांक: प्रणाली हरचिलकर (भारंगीची पानवडी), तृतीय क्रमांक: मयुरी रामाणे (भारंगीची वडी), उत्तेजनार्थ: रुचिका जामसुदकर (टाकळ्याचे लॉलीपॉप व बांबूच्या कोंबाचे काप) यांनी पटकावला.
या प्रसंगी रावे समन्वयक डॉ. अशोककुमार चव्हाण, विस्तार शिक्षण विभाग प्रमुख डॉ. वरवडेकर, विषय विशेषज्ञ डॉ. पालशेतकर, डॉ. प्रसादे, डॉ. रणजीत महाडिक, तसेच कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रवीण झगडे व डॉ. आशिष शिगवण उपस्थित होते. हा कार्यक्रम कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. रमेश कुणकेरकर व रावे समन्वयक डॉ. अशोककुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कृषी सहाय्यक समीर उसरे, श्रीयश पवार, चंद्रकांत साळवी आणि ‘कृषी संगिनी’ व ‘संजीवनी’ समूहातील सर्व कृषीकन्यांनी विशेष परिश्रम घेतले. या उपक्रमामुळे साखळोलीत पारंपरिक अन्नसंस्कृतीबद्दल नवचैतन्य निर्माण झाले आहे.

























1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.