loader
Breaking News
Breaking News
Foto

लिफ्ट मधून बाहेर पडताना अडकल्याने पन्नास वर्षे महिलेचा दुर्दैवी मृत्यू , देखभाल दुरुस्ती कडे दुर्लक्ष प्रमुख कारण!

आंध्र प्रदेश - आंध्र प्रदेशातील प्रकाशम जिल्ह्यात लिफ्टमधून बाहेर पडताना अडकल्यामुळे ५० वर्षीय विनीता यांचा मृत्यू झाला. ओंगोल येथील एका निवासी इमारतीत ही भीषण दुर्घटना घडली.ङ्गही घटना सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाली आहे. अपघात झाला तेव्हा विनीता या एका तरुणी आणि एका लहान मुलासोबत लिफ्टमधून प्रवास करत होत्या. लिफ्टमधील इतर दोघे जण सुरक्षितपणे बाहेर पडण्यात यशस्वी झाले, मात्र विनीता बाहेर पडत असतानाच लिफ्ट अचानक खाली जाऊ लागली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त्यानंतर ती लिफ्टचे छत आणि लँडिंग यांच्यामध्ये अडकली. ती महिला आणि तिच्यासोबत असलेले मूल, तसेच इमारतीतील इतर रहिवासी, तिला वाचवण्यासाठी तातडीने धावून आले. सुरुवातीला तिला बाहेर काढताना अडचणी आल्या, तरी अखेरीस विनीता यांना बाहेर काढण्यात यश आले.त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, परंतु तिथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तांत्रिक बिघाड, अपुरा देखभाल-दुरुस्तीचा अभाव किंवा इतर कोणत्याही निष्काळजीपणामुळे हा अपघात घडला का, याचा तपास पोलीस करत आहेत.या घटनेमुळे अपार्टमेंटमधील रहिवाशांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. लिफ्टची देखभाल-दुरुस्ती आणि सुरक्षिततेच्या मानकांकडे विशेष लक्ष द्यावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg