loader
Breaking News
Breaking News
Foto

'माडाचे नारळ पडले’ सांगून वृद्धेच्या गळ्यातील सोन्याची माळ लंपास

देवगड (प्रतिनिधी) - शिरगाव साटमवाडी येथे घरात एकट्याच राहणाऱ्या एका वृद्ध महिलेला खोट्या बहाण्याने घराचा दरवाजा उघडायला सांगून तिच्या गळ्यातील सुमारे १ लाख ७५ हजार रूपये किंमतीची व २५ ग्रॅम वजनाची सोन्याची माळ अज्ञाताने खेचून तेथून पलायन केले. ही घटना १६ ऑगस्ट रोजी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी देवगड पोलीस स्थानकात दाखल फिर्यादीनुसार अज्ञात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरगाव साटमवाडी येथील जयश्री सदाशिव बावस्कर (८०) या घरात एकट्याच राहतात. १६ ऑगस्ट रोजी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास एका अनोळखी व्यक्तीने त्यांच्या घराचा दरवाजा ठोठावून 'तुमच्या माडाचे नारळ पडले आहेत', असे सांगितले. यादरम्यान जयश्री बावस्कर यांनी दरवाजा उघडून तो पुन्हा बंद करीत असताना त्या अनोळखी व्यक्तीने अचानक जयश्री बावस्कर यांच्या गळ्यातील सोन्याची चैन खेचली व तेथून पलायन केले. या घटनेची फिर्याद जयश्री बावस्कर यांनी देवगड पोलीस स्थानकात दिली असून पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष उगलमुगले करीत आहेत.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg