loader
Breaking News
Breaking News
Foto

सर्वोच्च न्यायालयात आज दुपारी २ वाजता सुनावणी होणार, पक्ष चिन्ह ठाकरेंकडे की शिंदेंकडे, याबाबत मोठा युक्तीवाद कपिल सिब्बल करणार

नवी दिल्ली - शिवसेना पक्ष आणि चिन्ह कोणाचे? याबाबत आज सर्वोच्च न्यायालयात दुपारी २ वाजता सुनावणीला सुरुवात होणार आहे. त्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष या सुनावणीकडे लागले आहे. शिवसेना पक्षाचे कायदेतज्ञ कपिल सिब्बल यांनी मागच्या सुनावणी दरम्यान जोरदार युक्तिवाद केला होता. त्यामुळे आता कोणता युक्तिवाद केला जाणार, यापूर्वी निवडणुक आयोगाला शिवसेना ठाकरे पक्षाने सर्व घडामोडीला जबाबदार ठरविले होते. पक्ष संघटना आणि संख्याबळ यात फरक असतो, हे न्यायालयाला दाखवून दिले. विधीमंडळ सदस्यांची बहुसंख्या म्हणजे पक्ष नव्हे, असे त्यांनी न्यायालयासमोर सुनावणीत सांगितले होते. निवडणुक आयोगाने जो निर्णय दिला, तो चुकिचा होता, असेही सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

निवडणुक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांनी कसे निर्णय दिले, याबाबत सिब्बल यांनी युक्तिवाद केला होता. निवडणुक आयोग कक्षेबाहेर गेले आणि शिंदेंच्या बाजूने निर्णय दिल्याचे म्हटले आहे. आजच्या सुनावणीत ठाकरेंच्या बाजूने कपिल सिब्बल युक्तिवाद करणार आहेत. पक्ष चिन्हावर ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण्यात आलेला दावा, खोडण्याचे मोठे आव्हान शिंदेंच्या शिवसेनेसमोर उभे राहील, कारण कपिल सिब्बल यांनी शिवसेनेची घटना, संघटना याबाबत बाजू मजबुतीने मांडली आहे. विधीमंडळात बहुसंख्य सदस्य एकत्र येत असताना मूळ शिवसेनेची संघटना निवडणुक आयोगाने तपासून पाहिली नसल्याचे युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला होता. शिवसेना शिंदे गटाकडून निरज किशन कौल, मनिंदर सिंह बाजू मांडतील.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg