सरंद (संदेश कदम) - संगमेश्वर तालुक्यातील माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या माखजन इंग्लिश स्कूल आणि ऍड. पी. आर. नामजोशी कला, वाणिज्य, विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय सरंद येथे शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालयाच्या "कृषी कन्या"च्या संयुक्त विद्यमाने आयोजित "रानभाज्या "आणि "कृषी महोत्सव प्रदर्शनाला "उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. या प्रदर्शनात शरदचंद्रजी पवार महाविद्यालय सावर्डे या महाविद्यालयाच्या कृषी कन्या पूर्वा जाधव, अनुष्का काजरोळकर, तन्वी सोलीम, प्रणाली थोरात, सुजाता बेंडबुडे या विद्यार्थिनींनी विविध प्रकारची कृषी अवजारे, कृषी पूरक मॉडेल, सहभागी ग्रामीण अभ्यास व मूल्यांकन (PRA) तसेच कृषी माहिती केंद्र प्रदर्शित करुन शेतीसाठी लागणाऱ्या "बियाणे आणि खते" यांची मौलिक माहिती दिली.
तसेच या प्रदर्शन महोत्सवात अनेक प्रचलित आणि दुर्मिळ रानभाज्यांची मांडणी, ओळख करण्यात आली. यावेळी प्रत्येक भाजीचे वैज्ञानिक आणि आयुर्वेदा नुसार महत्व पटवून देण्यात आले. यावेळी माखजन हायस्कूलच्या हरितसेना आणि कृषी विभागातील विध्यार्थ्यांनीही यावेळी "रानभाज्या" प्रदर्शन केले. या विद्यार्थ्यांना विठ्ठल भोईर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शशिकांत घाणेकर मार्गदर्शन करताना म्हणाले की,"रानभाज्या" ही आपली अनमोल संपत्ती आहे. जुन्या पिढीला याची संपूर्ण माहिती होती. आजच्या विध्यार्थ्यांनी ही माहिती करुन घेणे गरजेचे आहे. "रानभाज्यां मध्ये"खूप जीवनसत्वे असतात. कुपोषण दूर करण्यासाठी खरी ताकद ही रानभाज्यानंमध्ये आहे त्यामुळे प्रत्येकाने पालेभाज्या, रानभाज्या खाल्ल्याच पाहिजेत असे शशिकांत घाणेकर यांनी आवर्जून सांगितले.
यावेळी सह. सचिव दीपक शिगवण, सरंदचे उपसरपंच उमेश पवार, पोलीस पाटील नंदन भागवत, तंटामुक्ती समिती अध्यक्ष विश्वास पवार, प्रभावती गोटेकर, संतोष गोटेकर, मुख्याध्यापक महादेव परब, प्रा. अभिजित सुर्वे, रवींद्र पवार, विठ्ठल भोईर, कांचन जंगम, अभिजित सहस्त्रबुद्धे यांचेसह पालक - शिक्षक, विद्यार्थी आणि सरंद येथील ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.
























1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.