loader
Breaking News
Breaking News
Foto

पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये कृषी क्षेत्रातील करिअरच्या संधींवर मार्गदर्शन

रत्नागिरी - “भविष्यासाठी कृषी क्षेत्रात संधींची बीजे पेरा” या संदेशातून पोदार इंटरनॅशनल स्कूल, रत्नागिरी येथे इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘कृषी क्षेत्रातील करिअरच्या संधी’ या विषयावर विशेष करिअर मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला रोटरी क्लब रत्नागिरीचे पदाधिकारी, ओंकार अ‍ॅग्रो कंपनीचे निहार वैद्य तसेच कृषी अधिकारी सुमित कुळ्ये हे मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. मान्यवरांनी विद्यार्थ्यांना कृषी क्षेत्रातील विविध आधुनिक संधी आणि भविष्यातील करिअरच्या पर्यायांची सविस्तर माहिती दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या उपक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका प्राजक्ती गायकवाड यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांनी बदलत्या काळानुसार पारंपरिक करिअरच्या चौकटीपलीकडे जाऊन विविध क्षेत्रांतील संधींचा शोध घ्यावा, तसेच आपल्या आवडी आणि कौशल्यांनुसार योग्य करिअरची निवड करावी, यासाठी त्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरित केले. कृषी क्षेत्र हे केवळ पारंपरिक शेतीपुरते मर्यादित नसून विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवकल्पनांशी जोडलेले व्यापक क्षेत्र आहे, याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यावर त्यांनी भर दिला. कृषी म्हणजे केवळ शेती करणे ही पारंपरिक संकल्पना बदलत असून, आजचे कृषी क्षेत्र आधुनिक तंत्रज्ञान, विज्ञान आणि संशोधनावर आधारित व्यावसायिक क्षेत्र बनले आहे, याची जाणीव विद्यार्थ्यांना करून देण्यात आली. कृषी विज्ञान, अन्न तंत्रज्ञान, कृषी अभियांत्रिकी, कृषी व्यवसाय तसेच विविध शासकीय सेवांमधील संधींबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

टाईम्स स्पेशल

या वेळी विद्यार्थ्यांना आधुनिक कृषी यंत्रसामग्रीचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांना शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव घेता आला. कृषी क्षेत्र हे देशाच्या अर्थव्यवस्थेचा आणि अन्नसुरक्षेचा महत्त्वाचा आधार असून, या क्षेत्रात करिअर घडविण्याबरोबरच देशाच्या विकासातही योगदान देता येते, असा संदेश विद्यार्थ्यांना देण्यात आला. विद्यार्थ्यांनी केवळ पाठ्यपुस्तकांपुरते मर्यादित न राहता आपल्या आवडी, कौशल्ये आणि भविष्यातील संधींचा विचार करून विविध करिअर पर्यायांचा शोध घ्यावा, यासाठी हे मार्गदर्शन सत्र उपयुक्त ठरले. “जय किसान, जय विज्ञान!” या प्रेरणादायी संदेशाने कार्यक्रमाची सांगता झाली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या मनात कृषी क्षेत्राविषयी सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होऊन भविष्यातील करिअरच्या नव्या वाटा शोधण्यास त्यांना प्रेरणा मिळाली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg