loader
Breaking News
Breaking News
Foto

माळगाव येथील तालुकास्तरीय रानभाजी महोत्सवातील पाककला स्पर्धेत शेवग्याच्या घारग्यांचा प्रथम क्रमांक

मालवण (प्रतिनिधी) - रानभाजी महोत्सवात निसर्गाने आपल्याला मोफत दिलेला आणि औषधी गुणांनी नटलेला मोठा खजिना मांडला गेला आहे. ​रानभाज्यांमध्ये कोणत्याही रासायनिक खतांचा वापर नसतो, त्यामुळे त्या आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या असतात.काळाच्या ओघात नामशेष होणाऱ्या या निसर्गदत्त भाज्यांची ओळख नव्या पिढीला होतानाच याचे संवर्धन होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन रानभाजी अभ्यासक रामचंद्र शृंगारे यानी येथे केले. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागांतर्गत कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), सिंधुदुर्ग, उमेद व तालुका कृषी अधिकारी कार्यालय, मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय रानभाजी महोत्सवाचे आयोजन माळगाव हायस्कुल सभागृहात करण्यात आले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी पंचायत समिती सभापती प्रज्ञा चव्हाण, जि.प. सदस्य वर्षा सांबारी, क्षमा हडकर, पं.स. सदस्य दिपक चव्हाण, माळगाव सरपंच चैताली साळकर, सरपंच मठबूद्रूक मोहन वेंगूर्लेकर, सरपंच वडाचापाट सोनिया प्रभूदेसाई, सरपंच श्रावण श्रीम. नम्रता मूद्राळे, सरपंच पळसंब चंद्रकांत गोलतकर, सरपंच वेरळ धनंजय परब, शेतकरी सल्ला समिती मालवण अध्यक्ष प्रताप चव्हाण, तालूका कृषि अधिकारी मालवण रविंद्र पाटील, उप कृषी अधिकारी धनंजय गावडे, माळगाव एज्यू. सोसा. अध्यक्ष डाॅ.संजय खोत, मंडळ कृषि अधिकारी मालवण अमोल करंदीकर, ग्राम. अधि. युगल प्रभूगावकर, मंडळ कृषि अधि. पोईप श्रीपाद चव्हाण, मंडळ कृषि अधि. आचरा संचिता फाळके, निधी मूणगेकर, उप सरपंच शशिकांत सरनाईक, अरूण भोगले, संस्था सचिव हेमंत हडकर, उद्योजक दयानंद देसाई, आत्मा समिती सदस्य सानिका मूळे, शंकर गावडे, मुख्याध्यापक रवळू बेनके आदी उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

यावेळी सभापती प्रज्ञा चव्हाण यानी फास्ट फूडचे शरीरावर घातक परिणाम होत असून महिलांनी रान भाज्यांचा वापर आहारात करण्याचे आवाहन केले. डॉ संजय खोत यानी पाले भाजीचा वापर आहारात होणे आवश्यक आहे. निसर्ग जपा आणि निरंतन टिकवा असे आवाहन केले. प. स. सदस्य दीपक चव्हाण, प्रताप चव्हाण, अरुण भोगले यांनी मार्गदर्शन केले. महोत्सवा निमित्त आयोजित पाककला स्पर्धा निकाल पुढील प्रमाणे. प्रथम क्रमांक - शेवग्याचे घारगे, रत्ना राजेश लब्दे (माळगाव), द्वितीय क्रमांक - टाकळा लाडू नमिता महेश मूळीक (चांदेर), तृतीय क्रमांक - कूड्याच्या शेंगाची भाजी आणि चटणी अर्चना अतूल जोशी (खेरवंद), उत्तेजनार्थ - कूर्डू रोल गौरव गणेश मूणगेकर (कूमामे), उंबराच्या फळाची भाजी निकीता मंगेश पाताडे (वडाचापाट). सर्व विजेत्याना सन्मानचिन्ह, रोख रक्कम देण्यात आले. परीक्षण रानभाजी तज्ञ रामचंद्र शृंगारे, आरती कांबळी यानी केले. सूत्रसंचलन व आभार मंडळ कृषी अधिकारी श्रीपाद चव्हाण यानी तर प्रस्ताविक तालुका कृषी अधिकारी रवींद्र पाटील यांनी केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg