loader
Breaking News
Breaking News
Foto

चाफवली शाळा नंबर 2 मध्ये दिलीप रावण यांनी वाढदिवसानिमित्त केले शैक्षणिक साहित्याचे वाटप

देवळे (प्रकाश चाळके) - संगमेश्वर तालुक्यातील गावातील दिलीप रावण यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त चाफवली जिल्हा परिषद शाळा क्र. २ येथील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करून आपला वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपत साजरा केला. या प्रसंगी माजी सैनिक काशिनाथ भातडे, माजी सरपंच प्रकाश करवंजे, शाळेच्या मुख्याध्यापिका मोघे, शिक्षक रंजित माळी, विद्यार्थी वर्ग तसेच गावातील ग्रामस्थ मंडळी उपस्थित होती.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

वाढदिवसाच्या आनंदासोबत विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला हातभार लावण्याचा हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी असल्याचे सर्व वक्त्यांनी म्हटले. शाळेच्या वतीने दिलीप रावण यांचे मनःपूर्वक अभिनंदन व वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या. “आपला आनंद इतरांच्या चेहऱ्यावर उमटवणे, हाच खरा वाढदिवसाचा आनंद!”असे दिलीप रावण वाढदिवसानिमित्त म्हणाले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg