loader
Breaking News
Breaking News
Foto

तालुकास्तरीय ’मॉं तुझे सलाम’ आंतरशालेय समूह नृत्य आणि एकल नृत्य स्पर्धेत रोटरी स्कूलचे वर्चस्व

खेड (प्रतिनिधी) - स्व. मीनाताई ठाकरे सभागृह, खेड या ठिकाणी लायन्स क्लब ऑफ खेड सिटी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय ’मॉं तुझे सलाम’ या आंतरशालेय समूह नृत्य आणि एकल नृत्य स्पर्धा संपन्न झाली. यामध्ये रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूल खेडच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या गटात एकल नृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक तर समूह नृत्य स्पर्धेत तृतीय क्रमांक प्राप्त केला. सदरच्या तालुकास्तरीय ’मॉं तुझे सलाम’ स्पर्धेकरिता संपूर्ण खेड तालुक्यातील शाळांनी सहभाग नोंदविला होता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यामध्ये रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूल खेडच्या विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवत एकल नृत्य स्पर्धेत मोठ्या गटात स्वरा चाळके या विद्यार्थिनीने आपल्या भावपूर्ण नृत्य सादरीकरणातून देशाच्या शूर सैनिकांना मनःपूर्वक आदरांजली अर्पण केली. त्यांच्या त्याग, शौर्य आणि देशसेवेची गाथा नृत्याच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडली. या हृदयस्पर्शी सादरीकरणाने उपस्थितांच्या मनात देशभक्तीची भावना जागवत मोठ्या गटात प्रथम क्रमांक प्राप्त केला. तसेच मोठ्या गटात समूह नृत्य स्पर्धेत विद्यार्थ्यांनी आपल्या नृत्याच्या माध्यमातून विविध राष्ट्रीय प्रतिकांचे मनोहारी दर्शन घडविले. नृत्याच्या तालबद्ध आणि प्रभावी सादरीकरणातून राष्ट्रीय प्रतिकांचे महत्त्व व देशप्रेमाची भावना सुंदरपणे व्यक्त करून आपल्या नृत्याच्या माध्यमातून विविध राष्ट्रीय प्रतीकांचे मनोहारी दर्शन घडविले. नृत्याच्या तालबद्ध आणि प्रभावी सादरीकरणातून राष्ट्रीय प्रतीकांचे महत्त्व व देशप्रेमाची भावना सुंदरपणे व्यक्त करत तृतीय क्रमांकाला गवसणी घातली. या अनोख्या सादरीकरणाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

टाईम्स स्पेशल

तृतीय क्रमांक प्राप्त यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये अथर्व हलगवार, स्वरा चाळके, आर्या पाटणे, गुंजन शिवदे, अवनी मराठे, जुई नलावडे यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेल्या या यशामुळे त्यांना प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना नृत्य प्रशिक्षिका श्वेता चव्हाण यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे चेअरमन डॉ. उपेंद्र तलाठी, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg