loader
Breaking News
Breaking News
Foto

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दोडामार्ग एसटी आगाराला मनसेचे निवेदन

दोडामार्ग, (प्रतिनिधी) - गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर सणासुदीच्या काळात प्रवाशांची मोठी गर्दी होत असते. या कालावधीत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (एसटी) बससेवा वेळापत्रकानुसार गावागावात सुरळीतपणे पोहोचणे आवश्यक आहे. यासाठी दोडामार्ग एसटी आगाराने विशेष खबरदारी घ्यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सणासुदीच्या काळात एसटी बसमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे आगारातील सर्व बसची वेळेपूर्वी तपासणी करून आवश्यक दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करावीत, जेणेकरून प्रवासादरम्यान बस ब्रेकडाऊन होणार नाहीत आणि प्रवाशांना कोणत्याही प्रकारचा त्रास सहन करावा लागणार नाही. तसेच प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन आवश्यकता भासल्यास जादा एसटी बसेस उपलब्ध करून देण्याची तयारी ठेवावी, अशीही मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली. गणेशोत्सव काळात प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी एसटी प्रशासनाने नियोजनबद्ध पद्धतीने उपाययोजना कराव्यात, अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली.

टाईम्स स्पेशल

या निवेदनाची वरिष्ठ पातळीवर शहानिशा करून योग्य ती खबरदारी करण्यात यावी, अशी मागणी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. यावेळी दोडामार्ग मनसेचे तालुका अध्यक्ष विनायक सावंत, सचिव संदीप गवस, शहराध्यक्ष मधुसूदन खांबल , तसेच मनसैनिक पांडुरंग जाधव, दिलीप परीट, पुरुषोत्तम गवस, संतोष साळकर आणि जयद्रथ गवस उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg