वरवेली (गणेश किर्वे) - महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा संघटनेने रविवार, दिनांक २३ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९ वाजता नष्टे लॉन, बसंत बहार रोड, उद्योग भवन समोर, न्युज शाहुपुरी, कोल्हापूर येथे तेली समाजाचा भव्य निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी, नामदार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी मंत्री विजय वडेट्टीवार, महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार रामदास तडस, महासचिव डॉ. भूषण कर्डिले, उपाध्यक्ष गजानन शेलार, अशोक व्यवहारे, संजय विभूते, बळवंत मोरघडे, सुनिल चौधरी उपस्थित राहणार आहेत.
मेळाव्यात तेली समाजाच्या उन्नतीसाठी समाज संघटित करून एकजुटीने उभे राहिल्या शिवाय पर्याय नाही. तेली समाजाचा इतिहास कष्ट, जिद्द, चिकाटी, प्रामाणिकपणा आणि स्वाभीमानाने समृद्ध आहे. पूर्वजांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून आपल्या कुटुंबाचा आणि समाजाचा विकास साधला. आजच्या बदलत्या काळाचा विचार केला तर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते तेली समाज गुणवत्तेने कर्तृत्वाने आणि संख्येने मोठा असूनही संघटीत शक्तिच्या अपेक्षित स्थानावर पोहोचला नाही. म्हणून महाराष्ट्रातील तेली समाज बांधवांना एकत्र आणण्याचा निर्धार कोल्हापूर जिल्हा तेली समाज संघटनेने केला आहे.
तेली समाजाच्या एकजुटीचा, स्वाभीमानाचा आणि नव्या संकल्पाचा ऐतिहासिक क्षण आहे. पुढच्या पिढीसाठी शिक्षण, रोजगार, उद्योग आणि प्रगतीच्या नव्या वाटा निर्माण करण्यासाठी महाराष्ट्रातील तेली समाज संघटित, स्वाभीमानी आणि सक्षम शक्ती पूर्ण करून महाराष्ट्रात उभा करण्यासाठी निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील तेली समाज संघटना आपल्या पदाधिकार्यांसह, सभासद आणि तेली समाज बांधवांना घेऊन सहभागी होणार असल्याचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष रघुवीर शेलार यांनी सांगितले आहे.

























1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.