loader
Breaking News
Breaking News
Foto

न्यू इंग्लिश स्कूल पेंडूर येथे ईआय -टिंकर लॅबचे उद्घाटन

मालवण (प्रतिनिधी) - सध्याच्या आधुनिक तंत्रज्ञान आणि आर्टिफिशियल इंटीलिजन्स म्हणजेच एआय च्या युगात विद्यार्थ्यांना प्रगत तंत्रज्ञानाचे धडे मिळावेत या विचारातून मालवण तालुक्यातील माध्यमिक शिक्षण संस्था पेंडूर संचलित न्यू इंग्लिश स्कूल पेंडूर या प्रशालेने ईआय -टिंकर लॅबची निर्मिती केली आहे. विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान, तंत्रज्ञान, कोडिंग, रोबोटिक्स आणि नवोन्मेषी विचारांची आवड निर्माण करण्याच्या उद्देशाने निर्माण केलेल्या या ईआय -टिंकर लॅबचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष बाबाराव राणे यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी संस्थेचे सचिव घन:श्याम राणे, ईआय -टिंकर लॅबचे डायरेक्टर अभिजीत सहस्रबुद्धे, कृष्णमूर्ती, प्रशालेचे मुख्याध्यापक सुरेश तावडे सर, माजी मुख्याध्यापक सुरेश परब, कुणकवळे केंद्राचे केंद्रप्रमुख व विस्तार अधिकारी श्रीकृष्ण सावंत, आदी मान्यवर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ, पालक तसेच आजी-माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg