loader
Breaking News
Breaking News
Foto

आंबेरे खुर्द तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग पाते यांची तिसऱ्यांदा बिनविरोध निवड

आबलोली (संदेश कदम) - गुहागर तालुक्यातील निर्मल ग्रामपंचायत आंबेरे खुर्दच्या तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग गणपत पाते यांची तिसऱ्यांदा बिनविरोध निवड करण्यात आली. सोमवार दिनांक 17 ऑगस्ट 2026 रोजी निर्मल ग्रामपंचायत आबरे खुर्द या ग्रामपंचायतची ग्रामसभा विश्वास खर्डे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाली. यावेळी आंबेरे खुर्दच्या महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी सर्व समावेशक अनुभवी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग गणपत पाते यांची तिसऱ्यांदा बिनविरोध निवड करण्यात आली आहे. गुहागर तालुक्यातून पांडुरंग पाते यांचेवर सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पांडुरंग पाते सद्या भूषवीत असलेली पदे संचालक - गुहागर तालुका कुणबी नागरी सहकारी पतसंस्था लिमिटेड आबलोली, संचालक - गुहागर बाजार शृंगारतळी, अध्यक्ष - कुणबी समाजोन्नती संघ मुंबई, शाखा तालुका गुहागर (ग्रामीण), अध्यक्ष - ओबीसी संघर्ष समन्वय समिती गुहागर, अध्यक्ष - तंटामुक्ती समिती आंबेरे खुर्द, सरचिटणीस - भाग्योदय ज्ञान प्रसारक शिक्षण संस्था, पाचेरी आगर आदी पदांवर कार्यरत आहेत.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg