loader
Breaking News
Breaking News
Foto

संत रोहिदास महाराजांचा समतेचा संदेश प्रेरणादायी - आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल (प्रतिनिधी) - संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी उत्तर रायगड जिल्ह्याच्यावतीने जिल्ह्यात विविध धार्मिक, सामाजिक आणि जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. संत रोहिदास महाराजांच्या समतावादी विचारांचा प्रसार, सामाजिक एकोपा आणि बंधुभाव वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने ‘समरसता संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून समाजातील सर्व घटकांना एकत्र आणून संत रोहिदास महाराजांचा मानवतावादी आणि समतेचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. या अभियानाच्या नियोजनासाठी भाजपचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्तर रायगड जिल्हा भाजपची बैठक पनवेल शहरातील मार्केट यार्ड येथे पार पडली. बैठकीच्या प्रारंभी संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवर आणि कार्यकर्त्यांनी संत रोहिदास महाराजांच्या विचारांचे स्मरण करून सामाजिक समरसता, समानता, बंधुभाव आणि मानवतेची मूल्ये समाजात रुजविण्याचा संकल्प केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या बैठकीस भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर, पनवेल महापालिकेचे महापौर नितीन पाटील, जिल्हा सरचिटणीस व सभागृह नेते ऍड. प्रकाश बिनेदार, माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, अनुसूचित जाती जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे, अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अमित जाधव, बबन बारगजे, चिंतामण कडवे, बाबू गायकवाड यांच्यासह जिल्हा पदाधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्थांचे लोकप्रतिनिधी, विविध सेल व मोर्चांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg