loader
Breaking News
Breaking News
Foto

साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीपूर्वी सर्वसामान्यांना महागाईचा फटका

रत्नागिरी : सणासुदीचे दिवस जवळ येत असतानाच रत्नागिरीच्या बाजारपेठेत साखरेच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सध्या साखरेचा किरकोळ दर किलोमागे तब्बल ७० रुपयांवर पोहोचला असून, त्यामुळे सर्वसामान्यांच्या घरगुती बजेटवर अतिरिक्त आर्थिक भार पडत आहे. रत्नागिरी बाजारपेठेत कोल्हापूर येथून मोठ्या प्रमाणात साखरेचा पुरवठा होतो. सध्या पेट्रोलसाठी साखरेचा वापर वाढत असल्याने बाजारात साखरेच्या दरावर परिणाम होत असल्याचे व्यापारी सांगत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

रत्नागिरी शहर आणि परिसरात आठवड्याला सुमारे दोन हजार पोती साखरेचा खप होतो. त्यामुळे साखरेच्या दरवाढीचा थेट परिणाम ग्राहकांच्या खिशावर होत आहे. आता सणासुदीचा काळ सुरू होत असल्याने घराघरांत साखरेची मागणी वाढणार आहे. त्यातच दर किलोला ७० रुपयांवर गेल्याने सणांचा गोडवा महागला असून, सर्वसामान्यांना महागाईचा अतिरिक्त आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg