loader
Breaking News
Breaking News
Foto

विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास; आयोजकांच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह

फुरूस (प्रतिनिधी): लायन्स क्लब दापोली यांच्या वतीने दापोली येथील राधाकृष्ण मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांचा प्रवास धोकादायक पद्धतीने होत असल्याचे चित्र समोर आले आहे. विद्यार्थ्यांना क्षमतेपेक्षा अधिक संख्येने वाहनातून प्रवास करावा लागत असल्याचे या छायाचित्रातून दिसून येत असून, त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वाहनाच्या मागील बाजूस असलेल्या अरुंद जागेत अनेक विद्यार्थी अक्षरशः दाटीवाटीने उभे असल्याचे दिसत आहे. काही विद्यार्थी वाहनाच्या लोखंडी दांड्याला धरून प्रवास करत आहेत. अशा प्रकारे प्रवास करताना वाहनाला अपघात झाल्यास विद्यार्थ्यांच्या जीविताला मोठा धोका निर्माण होऊ शकतो.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

विद्यार्थ्यांसाठी स्पर्धांचे आयोजन करताना त्यांच्या ये-जा करण्याच्या सुरक्षिततेची जबाबदारीही संबंधित आयोजकांनी व शाळेच्या शिक्षकांनी गांभीर्याने घेणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि नियमबद्ध वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्याऐवजी अशा धोकादायक पद्धतीने प्रवास करावा लागत असल्याने आयोजकांच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी तडजोड न करता वाहतूक व्यवस्थेची योग्य पाहणी करून आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg