loader
Breaking News
Breaking News
Foto

देवगड हायस्कूलमध्ये प्रश्नमंजुषा स्पर्धा उत्साहात संपन्न

देवगड (प्रतिनिधी) - शेठ म. ग. हायस्कूल, देवगड येथे दीक्षित फाउंडेशनच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या प्रश्नमंजुषा स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. इयत्ता आठवीतील तब्बल १३५ विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत उत्साहाने सहभाग घेत आपल्या ज्ञानाचे व बुद्धिमत्तेचे दर्शन घडविले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रशालेचे मुख्याध्यापक प्रवीण खडपकर यांनी प्रास्ताविकातून स्पर्धेचा उद्देश व विद्यार्थ्यांसाठी अशा उपक्रमांचे महत्त्व स्पष्ट केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

स्पर्धेत प्रथम क्रमांक भाग्यश्री साबू लोणार (इयत्ता ८ वी ‘ड’), द्वितीय क्रमांक स्वरा विनायक बांदकर (इयत्ता ८ वी ‘क’) तर तृतीय क्रमांक कस्तुरी दीपक कांबळी (इयत्ता ८ वी ‘ड’) यांनी मिळविला. विद्यार्थिनी कस्तुरी दीपक कांबळी हिने आपले मनोगत व्यक्त केले प्रश्नमंजुषा स्पर्धेचे सूत्रसंचालन ऋत्विक धुरी व ज्ञानेश्वर कुंभरे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन ज्ञानेश्वर कुंभरे यांनी केले. संपूर्ण उपक्रम यशस्वी करण्यासाठी सहाय्यक शिक्षिका आफरीन पठाण यांनी विशेष मेहनत घेतली.

टाईम्स स्पेशल

विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानाची जिज्ञासा, आत्मविश्वास, स्पर्धात्मक वृत्ती तसेच सामान्यज्ञानाची आवड निर्माण करण्याच्या दृष्टीने ही प्रश्नमंजुषा स्पर्धा अत्यंत उपयुक्त ठरली. विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतल्याने संपूर्ण वातावरण ज्ञानमय व उत्साहपूर्ण झाले. दीक्षित फाउंडेशनचे अध्यक्ष निरंजन दीक्षित यांनी अंतिम प्रश्नमंजुषा स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg