loader
Breaking News
Breaking News
Foto

घोटगेवाडी दुर्घटनेनंतर तिसर्‍या दिवशीही शोधमोहीम सुरूच! युवक अजूनही बेपत्ता

दोडामार्ग - घोटगेवाडी कॉजवे परिसरात तिलारी नदीच्या वाढलेल्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलेल्या ६ वर्षीय चिमुरड्याचा मृतदेह काल शोधमोहीमेदरम्यान सापडला. मात्र, या दुर्घटनेतील २९ वर्षीय युवक अद्यापही बेपत्ता असून, त्याचा शोध घेण्यासाठी आज तिसर्‍या दिवशीही युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

बेपत्ता युवकाचा शोध घेण्यासाठी सह्याद्री ऍडव्हेंचर रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली असून, नदीपात्र, काठ तसेच संभाव्य ठिकाणी शोध घेतला जात आहे. शोधमोहीमेवर पोलिस प्रशासनाकडूनही लक्ष ठेवण्यात येत असून पोलिस निरीक्षक हेमचंद्र खोपडे हे रेस्क्यू पथकासोबत घटनास्थळी उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

दोन दिवसांपासून सुरू असलेल्या या शोधमोहीमेत अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. नदीच्या प्रवाहाचा वेग आणि परिसरातील परिस्थिती लक्षात घेऊन रेस्क्यू टीमकडून काळजीपूर्वक शोधकार्य सुरू आहे. दरम्यान, काल ६ वर्षीय चिमुरड्याचा मृतदेह सापडल्यानंतर आता बेपत्ता २९ वर्षीय युवकाचा शोध लागण्याची प्रतीक्षा आहे. प्रशासन, पोलिस आणि रेस्क्यू टीमकडून शोधमोहीम सुरूच ठेवण्यात आली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg