loader
Breaking News
Breaking News
Foto

कळंबणी बुद्रुक ग्रामपंचायतचे सरपंच भगवान साळुंके यांना राज्यस्तरीय सन क्रिस्टल गुणगौरव पुरस्कार

खेड - कळंबणी बुद्रुक गावचे प्रथम नागरिक गावचे सरपंच भगवान साळुंके यांना मानाचा राज्यस्तरीय सन क्रिस्टल पुरस्कार नुकताच बारामती येथे प्रदान करण्यात आला. सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रामध्ये स्वतःला वाहून घेऊन काम करणारे सरपंच म्हणून भगवान साळुंके यांची खेड तालुक्यात ओळख आहे. या अगोदर देखील भगवान साळुंके यांना अनेक राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गावाच्या विकासासाठी सामाजिक बांधिलकी साठी आणि लोकहिताच्या कार्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची पावती या पुरस्काराच्या निमित्ताने भगवान साळुंके यांना मिळाली आहे. हा पुरस्कार स्वीकारताना त्यांच्याबरोबर गावचे तंटामुक्ती समिती अध्यक्ष दत्ताराम येरापले व भगवान साळुंके यांचे कुटुंबीय उपस्थित होते. भगवान साळुंके यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल संपूर्ण खेड तालुक्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg