loader
Breaking News
Breaking News
Foto

संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - राजवाडी येथील श्रीदेव सोमेश्वर मंदिरात श्रावणमास उत्सवाला भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला आहे. गावातील ग्रामस्थ मोठ्या भक्तिभावाने हा उत्सव साजरा करीत आहेत. श्रावण महिन्यानिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये भजनसेवेला विशेष महत्त्व देण्यात आले असून, भाविक मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या उत्सवानिमित्त चिंतामणी प्रासादिक भजन मंडळ, विरार तसेच दत्तात्रय जोशी, रत्नागिरी यांनी भजन सेवा सादर केली. भक्तिमय अभंग, गवळणी व भजनांच्या सुरांनी मंदिर परिसर दुमदुमून गेला. ग्रामस्थ व भाविकांच्या सहभागामुळे श्रीदेव सोमेश्वर मंदिरातील श्रावणमास उत्सवाला उत्साहाचे आणि भक्तिमय स्वरूप प्राप्त झाले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg