loader
Breaking News
Breaking News
Foto

शिष्यवृत्ती परीक्षेत लांजा आगरवाडी शाळेचे १००% यश

केळंबे-लांजा (वार्ताहर) - राज्य परीक्षा परिषदेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या इयत्ता चौथीच्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती (स्कॉलरशिप) परीक्षेत जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा लांजा आगरवाडी या शाळेने १००% निकालाची उज्ज्वल परंपरा कायम राखत घवघवीत यश संपादन केले आहे. परीक्षेस बसलेले तिन्ही विद्यार्थी पैकी सर्व पात्र व एक शिष्यवृत्तीधारक ठरल्याने सर्वत्र कौतुक होत आहे. गुणवंत विद्यार्थ्यांचे यश यावर्षी आयोजित स्कॉलरशिप परीक्षेसाठी शाळेतून एकूण ३ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते आणि तिन्ही विद्यार्थ्यांनी पात्रता निकष पार करत १००% निकाल नोंदवला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

स्वरा अमोल मेस्त्री – २२० गुण (शहरी सर्वसाधारण गुणवत्ता यादीत ५५/११८ वा क्रमांक मिळवून शाळेचे व आगरवाडीचे नाव उज्ज्वल केले.) अवनी प्रज्योत रामाणे – १९२ गुण, चि. राज राजेश रांबाडे – १८२ गुण विद्यार्थ्यांच्या या अभूतपूर्व यशाबद्दल व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांकडून विशेष कौतुक करण्यात येत आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg