loader
Breaking News
Breaking News
Foto

तळवणेत 'झोया मरीन'च्या भव्य जहाज बांधणी प्रकल्पाचे भूमिपूजन

सावंतवाडी (प्रतिनिधी) - सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला एक नवी दिशा देणाऱ्या आणि रोजगाराच्या विपुल संधी निर्माण करणाऱ्या 'झोया मरीन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड' च्या भव्य जहाज बांधणी प्रकल्पाच्या माध्यमातून २०० बोटी बनवण्याच काम तळवणे गावात होणार असून स्थानिक २०० युवक-युवतींना याच भागात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येतील, रिव्हर्स माइग्रेशनची ही सुरूवात असून आरोंदा- रोडी बंदर, ताज पंचतारांकित प्रकल्प शिरोडा वेळागर भागात होणार असून लोकांनी आता विकासाला साथ द्यावी, आपलं हित साधून विरोधकांच्या भुलथापांना बळी पडू नये, असे आवाहन बंदर व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी केले. या प्रकल्पाचे भूमिपूजन मंत्री राणेंच्या हस्ते करण्यात आले.‌ यावेळी ते बोलत होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मंत्री राणे म्हणाले, जहाज बांधणी प्रकल्पाचा आज शुभारंभ होत असून सिंधुदुर्ग जिल्ह्याला महाराष्ट्राच्या नकाशावर आणण्याचे काम खासदार नारायण राणेंनी केलं. या प्रकल्पाच्या पहिल्या बोटीच्या शुभारंभाला त्यांना इथे घेऊन यायचं आहे. पालकमंत्री झाल्यानंतर आमच्या भागात रोजगार निर्माण व्हावा यासाठी पुढाकार घेतला असून रिव्हर्स माइग्रेशनची ही सुरूवात आहे. जिल्ह्यातील तरूणांना इथेच रोजगार मिळावा म्हणून आपला प्रयत्न आहे. काहीजण जमीन व्यवहारावरून जिल्ह्याची प्रतिमा खराब करण्याचे काम करत आहेत. मात्र, त्यांना उत्तर देत न बसता कामातून उत्तर देण्याचा निश्चय मी केला आहे‌. नारायण राणे यांनी अनेक प्रकल्प जिल्ह्यात आणले. त्यामुळे जेव्हा पालकमंत्री झालो तेव्हाच येथील लोकांसाठी योगदान देण्याचा निर्धार केला. आतापर्यंत आपली मूलं गोव्यात जात होती. मात्र, आज गोव्यातील कंपनी महाराष्ट्रात आणण्याचं काम आम्ही केल आहे.

टाईम्स स्पेशल

गोवा, कर्नाटक पेक्षा मोठी गुंतवणूक सिंधुदुर्ग करण्याचा शब्द त्यांनी दिला असून महाराष्ट्र सरकारकडून त्यांना संपूर्ण सहकार्य दिलं जाईल, असा विश्वास राणेंनी व्यक्त केला. तर २०० बोट बनविण्याचे काम इथे होणार असून मुंबईतील वॉटर मेट्रो या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्वकांक्षी प्रकल्पासाठी येथे काम होणार असून त्या बोटी बनवण्याच काम हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणार आहे‌‌. चायना टेक्नॉलॉजीचा वापर ते करणार आहेत. कारखाना उभारणीनंतर दीड ते दोन महिन्यात पहिली बोट तयार होणार असून २०० स्थानिक तरूण-तरूणींना रोजगार देण्याच काम इथे होणार आहे. येथील युवकांना ट्रेनिंगसाठी देखील सहकार्य केले जाणार आहे. त्यामुळे युवापिढीने आता भुलथापांना बळी पडू नये असं आवाहन मंत्री राणेंनी केल.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg

दोनशे स्थानिकांना रोजगार देणार

foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg